मराठी बातम्या /बातम्या /मनी /IndiGo Airlinesची भरारी! बनली जगातली सहावी सर्वांत मोठी विमान कंपनी

IndiGo Airlinesची भरारी! बनली जगातली सहावी सर्वांत मोठी विमान कंपनी

जगातील सहाव्या क्रमांकाची एअरलाइन बनलेल्या इंडिगोने गुंतवणूकदारांचीही निराशा केलेली नाही. इंडिगोच्या शेअरने 1 वर्षात 25 टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे.

जगातील सहाव्या क्रमांकाची एअरलाइन बनलेल्या इंडिगोने गुंतवणूकदारांचीही निराशा केलेली नाही. इंडिगोच्या शेअरने 1 वर्षात 25 टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे.

जगातील सहाव्या क्रमांकाची एअरलाइन बनलेल्या इंडिगोने गुंतवणूकदारांचीही निराशा केलेली नाही. इंडिगोच्या शेअरने 1 वर्षात 25 टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे.

नवी दिल्ली, 10 एप्रिल : एअरलाइन कंपनी इंडिगो (IndiGo Airlines) ही सध्या जगातील वेगानं विस्तारणारी कंपनी बनली आहे. ऑफिशियल एअरलाइन गाइड (OAG) या जागतिक प्रवासाविषयीचा डेटा उपलब्ध करून देणार्‍या एजन्सीनं म्हटलंय की, इंडिगो प्रवासी संख्येच्या बाबतीत मार्चमध्ये जगात सहाव्या क्रमांकावर आहे. इंडिगो ही कमी किमतीची विमान कंपनी आहे, ती कमी किमतीत विमान प्रवासाची संधी देते. इंग्लंड-मुख्यालय असलेल्या OAG नुसार, मार्चमध्ये इंडिगोच्या फ्लाइटमधून 2 लाख लोकांनी प्रवास केला. ही आशियातील सर्वोच्च आकडेवारी आहे. ही आकडेवारी 28 मार्चपर्यंतची आहे. मार्चमध्ये, आसन क्षमतेच्या बाबतीत जगातील टॉपच्या 10 एअरलाइन्समध्ये देखील Indigoचा समावेश करण्यात आला होता.

OAG मासिक डेटावर आधारित जगातील 20 सर्वात मोठ्या एअरलाइन्सची यादी प्रसिद्ध करते. या यादीत समाविष्ट होणारी इंडिगो ही भारतातील एकमेव कंपनी आहे. देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेतही इंडिगो पहिल्या क्रमांकावर आहे. तिचा बाजारातील हिस्सा सर्वाधिक आहे. खासगी विमान कंपनी जेट एअरवेज बंद झाल्यामुळे इंडिगोला मोठा फायदा झाला होता.

इंडिगोने ऑगस्ट 2006 मध्ये विमानाच्या उड्डाण-फेऱ्यांना सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यात एकच विमान होतं. आज त्यांच्या ताफ्यात 276 विमानं आहेत. जानेवारी 2022 पर्यंत देशांतर्गत विमान वाहतूक बाजारात त्यांचा 55.5% हिस्सा आहे. ही कंपनी 97 गंतव्यस्थानांना हवाई सेवा प्रदान करते. यामध्ये 73 देशांतर्गत आणि 24 आंतरराष्ट्रीय स्थळांचा समावेश आहे.

हे वाचा - Gold Price: सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता, काय आहेत कारणं?

लवकरच हवाई सेवेचा विस्तार

इंडिगोचे सीईओ आणि संचालक रॉनजॉय दत्ता यांनी त्यांच्या एअरलाइन्सच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. देश कोरोनाच्या साथीतून वेगानं सावरत असल्याचंही हे द्योतक आहे." ते म्हणाले की, जगभरातील हवाई सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर, इंडिगो अधिक मार्गांवर सेवा प्रदान करेल आणि सेवांची वारंवारताही वाढवेल. या कंपनीने एप्रिलमध्ये बंद केलेली अनेक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतातील अनेक विमानतळांवरून त्याची 150 परदेशी उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. कंपनीने आपले देशांतर्गत नेटवर्कही वाढवलं ​आहे.

हे वाचा -LIC Policy : दररोज केवळ 73 रुपये गुंतवणूक करुन मिळवा 10 लाख रुपये

गुंतवणूकदारांना चांगला परतावा

जगातील सहाव्या क्रमांकाची एअरलाइन बनलेल्या इंडिगोने गुंतवणूकदारांचीही निराशा केलेली नाही. इंडिगोच्या शेअरने 1 वर्षात 25 टक्क्यांहून अधिक नफा दिला आहे. शुक्रवारी इंडिगोचा शेअर 1.24 टक्क्यांनी वाढून 2005 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी 12 एप्रिलला त्याच्या शेअरची किंमत 1,593 रुपये होती.

First published:
top videos

    Tags: Airplane, Domestic flight