मराठी बातम्या /बातम्या /देश /बॉस असावा तर असा; आयटी कंपनीच्या CEOने कर्मचाऱ्यांना दिली BMW कार

बॉस असावा तर असा; आयटी कंपनीच्या CEOने कर्मचाऱ्यांना दिली BMW कार

Chennai IT Firm BMW car Gift: जागतिक सॉफ्टवेअर सेवा प्रदाता Kissflow Inc ने शुक्रवारी त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकार्‍यांना कंपनीच्या प्रती त्यांची निष्ठा आणि वचनबद्धता लक्षात घेऊन या सर्वांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या पाच BMW कार भेट दिल्या.

पुढे वाचा ...

चेन्नई, 9 एप्रिल - प्रामाणिकपणा, निष्ठा आणि चांगलं काम करणाऱ्यांसाठी नेहमीच बक्षीस असतं काही वेळा ते महागड्या बीएमडब्ल्यू कारच्या रूपात देखील मिळू शकतं. चेन्नईस्थित एका आयटी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांसोबत असंच काहीसं घडलं आहे. त्यांनी कोविड-19 महामारीच्या कठीण काळातही कंपनीला चांगली साथ दिली. यासाठी त्यांच्या बॉसने त्यांना महागडी बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे.

जागतिक सॉफ्टवेअर सेवा प्रदाता Kissflow Inc ने शुक्रवारी त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापन अधिकार्‍यांना कंपनीच्या प्रती त्यांची निष्ठा आणि वचनबद्धता लक्षात घेऊन या सर्वांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या पाच BMW कार भेट दिल्या.

हे वाचा - भारताची नवीन वाहतूक प्रणाली! डोंगर-दऱ्यांमध्ये हवेतून जाताना दिसतील केबल कार

कार पुरस्कार सोहळा गुप्त ठेवण्यात आला होता आणि पुरस्कार विजेत्यांना या महागड्या आणि आलिशान कार घेण्याचा विशेषाधिकार देण्यात येत असल्याची माहिती काही तास आधी देण्यात आली होती. Kissflow Inc. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुरेश संबंदम यांच्या मते, सन्मानित करण्यात आलेले पाच लोक कंपनीच्या स्थापनेपासून संबंधित आहेत आणि संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत आहेत.

त्यांनी सांगितलं की, ज्या लोकांना कार देण्यात आली आहे, त्यापैकी काही साध्या पार्श्वभूमीचे आहेत आणि कंपनीमध्ये येण्यापूर्वी त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं.

 अशाच प्रकारे ब्रिटनमध्येही एका बॉसने कर्मचाऱ्यांना वाटले होते 37 लाख रुपये

ब्रिटनच्या एमरी टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सचे (Emery Timber & Builders Merchants) व्यवस्थापकीय संचालक जेम्स हिपकिन्स (51) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक जबरदस्त भेट दिली. त्यांनी कंपनीच्या 60 सदस्यांमध्ये सुमारे 37 लाख रुपये वाटले.

या कंपनीच्या बॉसने (Company Boss) आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुमारे 62-62 हजार रुपये दिले आहेत. जेणेकरून त्यांना वीज बिलाच्या वाढीव दरामुळे कोणतीही अडचण येऊ नये. जर कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला मिळायला हवा, असं त्यांचं मत आहे.

हे वाचा - बॉस पाहिजे तर असा! कंपनी नफ्यात असल्यानं कर्मचाऱ्यांनाही केलं मालामाल

 जेम्स यांनी याबर बोलताना सांगितलं होतं की, हे पैसे त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत करेल. यूकेमध्ये मूलभूत गोष्टींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे जेम्सला वाटते.

First published:
top videos

    Tags: Chennai, Reward