Home /News /videsh /

बॉस पाहिजे तर असा! कंपनी नफ्यात असल्यानं कर्मचाऱ्यांनाही केलं मालामाल

बॉस पाहिजे तर असा! कंपनी नफ्यात असल्यानं कर्मचाऱ्यांनाही केलं मालामाल

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बक्षीस न देणे चुकीचे आहे, असे त्यांचे मत आहे. ते म्हणाले- आमच्या कंपनीच्या व्यवसायात चांगला नफा मिळत आहे. ज्यांच्यामुळे हा नफा होत आहे, त्यांना त्यातील काही भाग परत देणे योग्य आहे.

    नवी दिल्ली, 05 एप्रिल : एका कंपनीच्या बॉसने (Company Boss) आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुमारे 62-62 हजार रुपये दिले आहेत. जेणेकरून त्यांना वीज बिलाच्या वाढीव दरामुळे कोणतीही अडचण येऊ नये. जर कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला मिळायला हवा, असे त्यांचे मत आहे. ब्रिटनच्या एमरी टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सचे (Emery Timber & Builders Merchants) व्यवस्थापकीय संचालक जेम्स हिपकिन्स (51) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक जबरदस्त भेट दिली. त्यांनी कंपनीच्या 60 सदस्यांमध्ये सुमारे 37 लाख रुपये वाटले. जेम्स म्हणाले की, मला माहीत आहे की, प्रत्येकजण संकटात आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदत करून कंपनीचा नफा वाटून घ्यायचा होता. वास्तविक, गेल्या आठवड्यातच ब्रिटनमध्ये वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरांसाठी कौन्सिल टॅक्स बिलातही 3.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्याच्या बिलातही वाढ करण्यात आली आहे. जेम्सने द सनशी संवाद साधताना सांगितले, प्रत्येकजण सध्या त्रासदायक परिस्थितीशी झगडत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या कर्मचार्‍यांसह काही आनंद वाटायचा आहे. कर्मचारी सदस्यांना या बोनसची अपेक्षा नव्हती आणि ते खूप आनंदी झाले. या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्यासाठी ही मोठी मदत आहे. हे वाचा - काय म्हणावं याला! PUBGसाठी 12 वर्षीय मुलाचा नको तो प्रताप; पोलिसांनाही फुटला घाम जेम्सला आशा आहे की, हे पैसे त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत करेल. यूकेमध्ये मूलभूत गोष्टींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे जेम्सला वाटते. एमरीज टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सच्या मालकाने सांगितले की, आमच्या कंपनीचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बक्षीस न देणे चुकीचे आहे, असे त्यांचे मत आहे. ते म्हणाले- आमच्या कंपनीच्या व्यवसायात चांगला नफा मिळत आहे. ज्यांच्यामुळे हा नफा होत आहे, त्यांना त्यातील काही भाग परत देणे योग्य आहे. हे वाचा - सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?या फोटोमागची प्रेरणादायी कहाणी वाचाच जेम्स शेवटी म्हणाले, एक चांगला बॉस तो असतो जो चांगला नफा कमावतो, पण कंपनीतील प्रत्येकाला चांगले वातावरण आणि चांगली संधी देणे ही त्याची जबाबदारी असते.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Worker

    पुढील बातम्या