अजब गोलमाल! ज्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसला त्यालाच 165 कोटींना विकण्याचा रचला कट आणि...

अजब गोलमाल! ज्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसला त्यालाच 165 कोटींना विकण्याचा रचला कट आणि...

ब्रेकफस्ट, लंचनंतर बिल नाही तर थेट 165 कोटींना हॉटेल विकायला निघाले.

  • Share this:

चेन्नई, 06 फेब्रवारी : बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये चोरीचे विविध फंडे आपण पाहतो. काही वेळा हे फंडे खऱ्या आयुष्यातही आजमावले जातात. मात्र अशीच एक फिल्मी घटना चेन्नईमध्ये घडली. चेन्नईमध्ये तीन अवलियांनी चक्क ज्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसले होते, तेच हॉटेल विकण्याचा कट रचला. चक्क त्यांनी हे हॉटेल 165 कोटींना विकण्याचा कट रचला होता. हा सगळा प्रकार एका वेटरच्या चतुराईने उघडकीस आला.

हे सगळे प्रकरण चेन्नईच्या 'अंबिका अम्पायर' हॉटेलमधले आहे. या हॉटेलमध्ये आलेल्या तिघांनी एका प्रसिद्ध ग्रुपला हे हॉटेल विकण्याचा प्लॅन अंतिम केला होता. तीन आरोपींनी 165 कोटी रुपयांना हॉटेलची विक्री करण्याचा कट रचला होता. मात्र, ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुढील चौकशी केली.

वाचा-शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या बछड्याशी सरड्याने घेतला पंगा! थरारक VIDEO

वाचा-किशोर कुमार यांच्या सिनेमावर कोर्टानं घातली होती बंदी, 60 वर्षांनी सापडली रिल्स

‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पाच लोक या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसून हे हॉटेल विकण्याचा कट रचत होते. त्यांनी स्वत:ची हॉटेल मालक आणि सरव्यवस्थापक म्हणून ओळख करून दिली. दरम्यान, हॉटेल स्टाफने त्यांचे संभाषण ऐकले आणि त्यांना संशयास्पद वाटल्यास त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला त्याविषयी माहिती दिली. हॉटेल मॅनेजरने हॉटेल मालकाला याबाबत माहिती दिली व त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.

वाचा-रनवेवर घसरून विमानाचे झाले 3 तुकडे, 183 प्रवाशांच्या डोळ्यासमोर होता मृत्यू

वाचा-‘शापित’ पांढऱ्या कोब्राचं गोंदियात दर्शन, दुर्मिळ सापाला पाहून घाबरगुंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे हॉटेल विकण्यासाठी केरळमधील एका खासगी कंपनीशी बोलणे सुरू होते. फोनवरून झालेल्या चर्चेनंतर एक टीम चेन्नईला पोहोचली, जे हॉटेलमध्येच थांबले होते. त्याने त्या हॉटेलला संपूर्ण हॉटेल दाखवलं आणि मग ते 165 कोटींमध्ये विकायचं ठरलं. आमच्याकडून हॉटेल व्यवस्थापनाकडून तक्रारी आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यानंतर पोलिस चौकशीसाठी दाखल झाले आणि त्यांनी परमानंदम आणि दक्षिणामूर्ती यांच्यासह 70 वर्षीय करुणाकरण या तिघांना ताब्यात घेतले.

First published: February 6, 2020, 2:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या