रनवेवर घसरून विमानाचे जागीच झाले 3 तुकडे, 183 प्रवाशांच्या डोळ्यासमोर होता मृत्यू आणि... पाहा VIDEO

रनवेवर घसरून विमानाचे जागीच झाले 3 तुकडे, 183 प्रवाशांच्या डोळ्यासमोर होता मृत्यू आणि... पाहा VIDEO

तुर्की (Turkey) येथील इस्तंबूलच्या विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला. धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाच अपघात झाला.

  • Share this:

इस्तंबूल, 06 फेब्रुवारी : तुर्की (Turkey) येथील इस्तंबूलच्या विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला. धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाच अपघात झाला. यावेळी विमानत तब्बल 183 प्रवासी होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर 157 प्रवासी जखमी झाले आहेत. इस्तंबूलचे आरोग्यमंत्री फहारेटीन कोका यांनी ही माहिती दिली.

फहारेटीन कोका यांनी, बुधवारी इस्तंबूलच्या सबिहा गोकसेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर विमान घसरल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याच सांगितले. तर, दोन जणांना आयसीईयूमध्ये ठेवले गेले आहे, परंतु त्यातील कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही आहे. इस्तंबूलचे राज्यपाल अली यार्लिकया यांनी एका नवीन ट्वीटमध्ये सांगितले की, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.19 मिनिटांनी हा अपघात झाला. यावेळी तुर्की पेगासस एअरलाइन्सचे हे विमान 183 प्रवाशांनी भरले होते. हे विमान उतरल्यानंतर लगेचच धावपट्टीवरून घसरले. यापूर्वी विमानतळावर त्यांनी पत्रकारांना सांगितले की खराब हवामानामुळे विमान धावपट्टीवर नीट उतरले नाही आणि 30 ते 40 मीटर उंचीवरून खाली पडले. सीएनएनच्या वृत्तानुसार, विमानात तीन तुकडे झाल्यानंतर आग लागली.

वाचा-लग्न मोडलं म्हणून तरुणीने प्रियकरासमोरच स्वत:ला जिवंत पेटवलं

वाचा-कोरोनामुळे वाचली मुलीची इज्जत, बलात्कारासाठी रूममध्ये घुसला तरुण आणि...

वाचा-सारा-कार्तिकनं रणवीर सिंहपासून लपवलं होतं 'हे' सत्य, आता झाला खुलासा

वाचा-पुण्यात चाईल्ड पार्नोग्राफीच्या तब्बल 150 VIDEO झाले अपलोड, दोघांना अटक

तुर्की टीव्ही प्रसारकांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये असे दिसते आहे की विमानाचा पुढील भाग तुटून पडला आहे आणि विमानाचे एकूण तीन भाग तुटलेले आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की तुर्की शहर इझमिर येथून येणार्‍या विमानात इतर अमेरिकन नागरिकांसह चार अमेरिकन आणि चार चिनी नागरिक होते.

एनटीव्हीच्या प्रसारणकर्त्यांनी सांगितले की, एक चीनी नागरिक जखमी झाला आहे, त्याला जवळच्या रुग्णालयात आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आदेश येईपर्यंत हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे.

First published: February 6, 2020, 12:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या