नवी दिल्ली, 06 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Cabinet Expansion) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याची कमालीच उत्सुकता राजकीय नेत्यांना लागली आहे. महाराष्ट्रातून खासदार प्रीतम मुंडे आणि नारायण राणे (narayan rane) मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राणे यांच्याकडे शिवसेनेकडे (shivsena) असलेलं अवजड खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती. अखेर, या विस्ताराला आता मुहुर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी माहिती मिळाल्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहे. नारायण राणे आज सायंकाळी दिल्लीत पोहचणार आहे. सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी जावून भेट घेणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे. राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, शिवसेना एनडीएमध्ये असताना अवजड खाते हे शिवसेनेकडे देण्यात आले होते. अवजड खात्यावरून शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती.
2014 मध्ये देखील शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय होतं. त्यावेळी अनंत गीते हे केंद्रात शिवसेनेचे मंत्री होती. पण, अनंत गीते यांना रायगडमधून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता अरविंद सावंत यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2019 मध्ये शिवसेनेला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष होतं. पण, त्यावेळी देखील अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे कायम ठेवण्यात आलं.
शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; अपयशानंतर असं केलं टार्गेट पूर्ण
राज्यात शिवसेना – भाजप एकत्र लढल्यानं दोन्ही पक्षांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला केंद्रात महत्त्वाचं पद दिलं जाण्याची चर्चा होती. पण, 2014 प्रमाणे 2019मध्ये देखील शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं होतं. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आणि अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
राज्यात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. याच वादाचा फायदा घेत मोदी सरकारकडून सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा एका प्रकारे प्रयत्न होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Shivsena