मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; परीक्षेत अपयश आल्यानंतर असं केलं टार्गेट पूर्ण

शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; परीक्षेत अपयश आल्यानंतर असं केलं टार्गेट पूर्ण

आकाश कुल्हारी आपल्या मेहनतीने आयपीएस ऑफिसर बनले आहेत.

आकाश कुल्हारी आपल्या मेहनतीने आयपीएस ऑफिसर बनले आहेत.

अभ्यासामध्ये फारच कमी प्रगती असलेले आकाश कुल्हारी (IPS Akash Kulhari) दहावीत नापास झाले. त्यामुळे त्यांना शाळेतूनच काढण्यात आलं.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 06 जुलै :  युपीएससीच्या परीक्षेत (UPSC Exam)आपला देशभरामध्ये लाखो विद्यार्थी बसतात मात्र फार विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळकतं. विविध राज्यातले विद्यार्थी या परीक्षेसाठी जय्यत तयारी करतात. काही विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्न मध्ये यश मिळतं तर, काही विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा परीक्षा दिल्यानंतर यशाला गवसणी घालता येते.

राजस्थानच्या बीकानेर (Rajasthan, Bikaner) शहरात राहणारे आणि कानपूरमध्ये ऍडिशनल पोलिस कमिशनर (Additional Commissioner of Police) म्हणून काम करणारे आकाश कुल्हारी आपल्या मेहनतीने आयपीएस ऑफिसर (IPS Akash Kulhari)  झाले आहेत.

(Dispoject Safety Needle ने दिली जाणार कोरोना लस; भारतात लसीकरण आता अधिक सुरक्षित)

JNU मध्ये शिकत असताना त्यांनी 2006 मध्ये पहिल्यांदा सिव्हिल सर्विसेसची परीक्षा (Civil Services Exam) दिली आणि त्यांची निवडही झाली.

आकाश सांगतात की, शाळेच्या दिवसांमध्ये त्यांचा सगळं लक्षात हे खेळाकडे असायचं. त्यांना क्रिकेट खेळायला जास्त आवडायचं. त्यामुळेच त्यांचं अभ्यासामध्ये मन लागायचं नाही. मात्र दहावीमध्ये अपयश मिळाल्यानंतर त्यांनी आपलं टार्गेट सेट केलं ते मिळवूनही दाखवलं.

(Google Classroom वापरताना येताहेत अडचणी?; ही खास बातमी तुमच्यासाठी)

आकाश कुल्हारी अभ्यासामध्ये फार हुशार होते. अभ्यास न करण्यामुळे त्यांना शिक्षक वर्गाबाहेर बसवायचे. दहावीला अतिशय कमी मार्क मिळवल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. बर्‍याचदा त्यांच्यामुळे कुटुंबियांना देखील अपमानित होण्याची वेळ यायची.

(एका घड्याळामुळे टळली त्याची वाईट वेळ; Smartwatch ने वाचवला जीव)

बरेच प्रयत्न केल्यावर त्यांना बिकानेरच्या केंद्रीय विद्यालयात ऍडमिशन मिळालं. त्यानंतर त्यांनी अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी इंटरमीडिएट परीक्षेमध्ये 55 टक्के मार्क मिळवले. त्यानंतर दुग्गल कॉलेज बिकानेर मधून 2001 मध्ये B.com पूर्ण केलं आणि M.comला ऍडमिशन घेतलं.

First published:

Tags: Ias officer, Inspiration, Inspiring story, Success, Success stories, Upsc exam