• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, अमित शहांसोबत होणार बैठक?

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, अमित शहांसोबत होणार बैठक?

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंददाराआड बैठक झाली होती.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंददाराआड बैठक झाली होती.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंददाराआड बैठक झाली होती.

  • Share this:
दिल्ली, 21 सप्टेंबर : एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्र्यांवर आरोपांचे सत्र सुरू आहे तर दुसरीकडे राज्यपाल (Governor ) आणि मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यातच शिवसेना (shivsena) आणि भाजपच्या (bjp) युतीची चर्चा रंगली आहे. अशा वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) पुन्हा एकदा दिल्लीच्या (delhi) दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहांसोबत (amit shah) बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाण्याची चिन्ह आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी  म्हणजे २६ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता आहे. आईने बाळाला टॉवेलऐवजी बँडेजमध्येच गुंडाळून ठेवलं; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंददाराआड बैठक झाली होती. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्र व्यवहारावरून वाद पाहण्यास मिळाला. राज्यपालांनी महिलांवरील अत्याचार प्रकरणावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून भाजपशासीत प्रदेशात होत असलेल्या अत्याचाराची आठवण करून राज्यपालांना सणसणीत टोला लगावला होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना प्रहार करत दिल्लीत जाऊन तक्रार करण्याचा इशारा दिला होता.

आणखी एक क्रिकेटपटू देश सोडणार, वर्ल्ड कपसाठी या देशाकडून खेळणार!

'राज्यपालांच्या विरोधामध्ये एक दिवस दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगावे लागेल की राजभवनात काय सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दस्तावेज आहे हा दस्तावेज आता राजभवनाच्या पटलावर आहे. राज्यपाल यांनी झाकली मूठ उघडण्याची गरज नव्हती आता त्यांनी मूठ उघडली आहे. राज्यपालांचे आ बैल मुझे मार असं काम केलं आहे. आता फक्त मूठ उघडली आहे, अजून काही उघडायला लावू नका' अशा इशारा राऊत यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं? विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना मा. राज्यपाल महोदयांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहात आहे. आपण सगळेच प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत. श्रीरामांनी महिलांचे रक्षण, सुरक्षा यासाठी धनुष्यबाण नेहमीच सज्ज ठेवला. पण त्या 'रामराज्या'त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? उत्तर प्रदेशात एका महिला खो खो खेळाडूवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. बिजनोरमध्ये रेल्वे स्थानकावर या पीडित मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. 10 सप्टेंबरला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नोकरीसाठी मुलाखत देऊन येताना रेल्वे स्थानकावरच ही घटना घडली. आरोपीने या मुलीवर बलात्कार केला व तिला ठार केले. उत्तर प्रदेशातील हाथरस, उनावमधील बलात्कार व अत्याचारांच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे. बदायू जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद तर संयुक्त राष्ट्रात उमटले होते. उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचे NCRB चे म्हणणे आहे. पण यावर तेथे विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी तेथील भाजपने केल्याचे दिसत नाही.

खून का बदला खून, जामिनावर बाहेर येताच आरोपीवर गोळीबार, जळगाव हादरलं

जम्मू-कश्मीरमधील कश्मिरी पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे नेहमीच शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांच्या नराधमी कृत्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मीरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी गांभीर्याने चर्चा केली. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेखदेखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत. हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत.
Published by:sachin Salve
First published: