मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खून का बदला खून, जामिनावर बाहेर येताच आरोपीवर गोळीबार, जळगाव हादरलं

खून का बदला खून, जामिनावर बाहेर येताच आरोपीवर गोळीबार, जळगाव हादरलं

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आज जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी भुसावळ येथे जात असताना नशिराबादजवळ...

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आज जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी भुसावळ येथे जात असताना नशिराबादजवळ...

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आज जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी भुसावळ येथे जात असताना नशिराबादजवळ...

  • Published by:  sachin Salve
इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 21 सप्टेंबर : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील भुसावळमध्ये (bhuswal) एखाद्या सिनेमाला शोभेल अशी थरारक घटना घडली आहे. खूनाच्या (murder) गुन्ह्यातील आरोपींची जामिनावर सुटका झाल्यामुळे एका टोळक्याने गोळीबार (gun fire) करत चॉपरने हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नशिराबादजवळ ही घटना घडली आहे. भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्‍याने आज नशिराबादजवळ गोळीबार आणि चॉपर हल्ला केला. या हल्ल्यात एक जण ठार झाला असून एक जखमी झाला आहे. VIDEO - हंड्यासारखी डोक्यावर ठेवली बाईक, हातांनी न धरताच गाडीवर चढवली धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय 20, राहणार पंचशील नगर भुसावळ) हा आपल्या वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी  जात होता. सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे. तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे. Minimum balance नसणाऱ्या खातेधारकांना मोठा झटका; बँकेने वसूल केले कोट्यवधी रुपये दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मयत धम्म हा आज सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून घरी जात असताना ही घटना घडली आहे. गेल्या 11 महिन्यांपासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता. विशेष म्हणजे. धम्म याचा उद्या 22 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. ताजी बातमी: एअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायूदल प्रमुख गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे.
First published:

Tags: Crime, Jalgaon, Murder, जळगाव

पुढील बातम्या