• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मऊमऊ बेबी टॉवेलऐवजी आईने चिमुकल्याला बँडेजमध्येच गुंडाळून ठेवलं; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

मऊमऊ बेबी टॉवेलऐवजी आईने चिमुकल्याला बँडेजमध्येच गुंडाळून ठेवलं; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

जिवंतपणी चिमुकला ममीसारखा झाला.

 • Share this:
  ब्रिटन, 21 सप्टेंबर : बाळाची (Baby) चाहूल लागताच आईबाबा त्याच्याबाबत खूप स्वप्नं रंगवू लागतात. काही जण तर अगदी आधीपासूनच बाळाच्या आगमनाची तयारी करतात. त्याच्यासाठी खेळणी, पाळणा, छोटे छोटे कपडे खरेदी करतात. आपल्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून अगदी मुलायम कपडे घेतात. पण एका आईवर मात्र आपल्या बाळाला मऊमऊ टॉवेलऐवजी बँडेजमध्येच गुंडाळण्याची वेळ ओढावली. एवढ्याशा चिमुकल्याला जिवंतपणीच ममीसारखं आयुष्य जगावं लागलं. याचं कारण म्हणजे त्याला असलेला गंभीर आजार (Severe Disease) . या चिमुकल्याला एक्झिमा (Eczema)  असल्याने त्याला बँडेज पट्ट्यांमध्येच गुंडाळून ठेवायची वेळ आली. एक्झिमामुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या, त्याच्या आईला त्याला आपल्या कुशीतही घेता येत नव्हतं. त्यामुळे आईला काळजावर दगड ठेवत आपल्या चिमुकल्याला बँडेजमध्ये गुंडाळून ठेवावं लागलं. हे वाचा - बापरे! आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक चाखलं तरी जाऊ शकतो जीव; तरुणीला विचित्र आजार मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार या मुलाची आई चियाराने सांगितलं, जेव्हा तिचा मुलगा सहा आठवड्यांचा होता तेव्हा त्याची त्वचा खूप कोरडी होती. त्यामुळे आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं. त्याची वैद्यकी तपासणी करून पाहिली. त्याला एक्झिमा असल्याचं निदान झालं. यानंतर त्याच्या त्वचेवर जखमा होऊ लागली. अगदी उचल्यानंतरही माझ्या मुलाला खूप वेदना व्हायच्या. एक्झिमामुळे तिच्या मुलाला बँडेज थेरेपी घ्यावी लागली. स्ट्राँग स्टेरॉईड क्रीम त्याच्या त्वचेवर लावून बँडेज पट्ट्या गुंडाळण्यात आल्या.. एखाद्या ममीला गुंडाळावं तशा या चिमुकल्याला पट्ट्या गुंडाळलं गेलं. दररोज या पट्ट्या बदलाव्या लागल्या. तीन आठवड्यांच्या बँडेज थेरेपीनंतर त्याचा परिणाम दिसून आला. पण तरी जखमा वाढल्या की त्याला क्रीम लावावीच लागते. हे वाचा - गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs दरम्यान हा चिमुकला आता चार वर्षांचा झाला आहे. वेळेनुसार त्याची प्रकृती चांगली झाली आहे, असं त्याच्या वडीलांनी सांगितलं. तो आता शाळेतही जाऊ लागला आहे. एक्झिमाची कारणं मुलांमध्ये एक्झिमाची (Eczema) अनेक कारणं असू शकतात. केमिकल बेस्ड क्रीम-पावडर,लोशन यासारख्या उत्पादनांचा बाळाच्या त्वचेवर वापर. साबणाची रिऍक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, धूळ-माती किंवा घाण यांचा संपर्क किंवा सिंथेटीक कपडे घालण्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. एक्झिमाच्या (Eczema)त्रासामुळे कुणालाही ही समस्या उद्भवू शकते. एक्जिमा कसा ओळखणार? मुलाच्या गालावर, कोपरावर, गुडघ्यावर आणि पाठीवर लाल पुरळ दिसत असेल. पाय, मान आणि मनगटात वारंवार पुरळ उठत असेल. पुळ्यांमधून पू आणि रक्त येत असेल, पुरळ आलेल्या ठिकाणी सूज येऊन पुरळ शरीराच्या इतर भागातही पसरत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.
  Published by:Priya Lad
  First published: