Home /News /national /

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित, संजय पांडेंना ईडीचे समन्स TOP बातम्या

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित, संजय पांडेंना ईडीचे समन्स TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 4 जुलै : राज्यात विधानभवनात पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा वियज झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र, शिंदे यांनी गटनेते पदाचा दावा केला होता. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. दुसरीकडे आज शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, शरद पवारांच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत मोठा निर्णय बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र, यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा दावा केला होता. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका : शरद पवार राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल : अरविंद सावंत शिवसेनेने 39 बंडखोर आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर शिंदे गटानेही 16 आमदारांविरोधात व्हीप मोडल्याची तक्रार केली आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयातच निकाली निघणार आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावतं यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. बुलेट ट्रेनसाठी पालघरची जागा अधिग्रहण करण्याचं ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर (Palghar) जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विरोधी पक्षनेतेपदासाठी 4 नावांची जोरदार चर्चा, पवार घेणार निर्णय सोमवारी बहुमत चाचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली ताकद सिद्ध करायची आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय पांडेंना ईडीचे समन्स राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेले मुबंईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीने (ED) समन्स बजावला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'हनुमान हे प्राणीच', ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांचं वादग्रस्त विधान हनुमान जन्मस्थळ वादात (Hanuma Birthplace controversy) आता ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांनी उडी घेतली आहे. विशेष म्हणजे हनुमान जन्मस्थळावरुन राज्यात सुरु झालेला वाद आता कुठेतरी शमत असताना ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांनी हनुमानाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या