जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अध्यक्ष निवडीवरुन शिवसेना खासदार भडकले म्हणाले, उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल

अध्यक्ष निवडीवरुन शिवसेना खासदार भडकले म्हणाले, उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल

अध्यक्ष निवडीवरुन शिवसेना खासदार भडकले म्हणाले, उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल

बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm uddhav thackery) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अखेर आज विधानसभा अध्यक्षाची (Assembly Speaker Election) निवडणूक पार पडली. शिंदे सरकारने आपली पहिली लढाई जिंकली आहे. पण, शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आता न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेने 39 बंडखोर आमदारांनी पक्षाचा आदेश मोडून मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर शिंदे गटानेही 16 आमदारांविरोधात व्हीप मोडल्याची तक्रार केली आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयातच निकाली निघणार आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावतं यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले अरविंद सावतं? राज्यात ज्या प्रकारे नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या सर्व गोष्टी संविधानानुसार झाल्यात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात नवं सरकार निर्माण करताना राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला निमंत्रण दिले नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून व्हिप जारी केल्यानंतरही बंडखोर आमदारांनी पक्ष आदेश मानला नाही. त्यामुळे याविरोधात आम्ही अध्यक्षांकडे कारवाईचं पत्र दिल आहे. 39 आमदारांनी पक्षादेश पाळला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी या आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, असं आम्ही अध्यक्षांना विनंती केली आहे. EXCLUSIVE : बुलेट ट्रेनसाठी पालघरची जागा अधिग्रहण करण्याचं ध्येय, मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट नवं सरकार पूर्ण करणार माध्यमात चुकीच्या बातम्या : सावंत शिवसेना पक्षाबाबत माध्यमांनी काही चुकीच्या बातम्या चालवल्या असल्याचेही सावंत म्हणाले. आज रविवार असल्याने विधीमंडळातील सेनेचं कार्यालय बंद होतं. माध्यमांमध्ये कार्यालयाच्या चाव्या शिंदे गटाकडे गेल्याच्या चुकीच्या बातम्या चालवण्यात आल्या होत्या. पण, लवकरच हे कार्यालया उघडणार असल्याचे सांवत यांनी सांगितले. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. त्या पक्षाचे आदेक्ष मान्य केले जातात. उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. देशाच्या संविधानावर घाला घातला जातोय हे देश बघतोय. परिशिष्ट 10 नुसार कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. राहुल नार्वेकर वियजी रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164, तर उद्धव गटाचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार आणि AIMIM चे आमदार तटस्थ राहिले. यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे आकडे खूपच रंजक होतील. शिवसेनेच्या सर्व 39 बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले तरीही विरोधकांकडे संख्याबळ नाही. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असून, त्यापैकी एका आमदाराचे निधन झाले आहे. 39 बंडखोर सदस्यांना काढून टाकल्यानंतर एकूण सदस्य संख्या 248 होते, त्यानंतर बहुमताचा आकडा 125 होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात