नवी दिल्ली, 7 जून : देशभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या नियंत्रणात आणणे अवघड जात आहे. त्यात अनेक तज्ज्ञांनी कोरोनासह जगण्याचं आवाहन केलं जात आहे. अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मंत्र्यांनी यांनी सांगितले.
हे वाचा-धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
रुपेरी पडद्यावरील खलनायक ठरला हिरो, अभिनेता सोनू सूदवरून राजकारण पेटलं!
मुंबईतील रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड; 500 जणांचे जीव धोक्यात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, School