Home /News /maharashtra /

मुंबईतील रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड; 500 जणांचे जीव धोक्यात

मुंबईतील रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड; 500 जणांचे जीव धोक्यात

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांचा निष्काळजीपणा वाढल्याने चिंता वाढली आहे.

    मुंबई, 7 जून : राज्यात मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाची 2.46 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोनाद्वारे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात वेगाने वाढणार्‍या कोरोना-संक्रमित रूग्णांसोबत बर्‍याच वेळा निष्काळजीपणा घ़डल्याच्या घटना समोर येत आहे. ज्यामुळे लोकांचे जीव टांगणीला लागत आहे. मुंबईतील वसई परिसरातील एका खासगी रुग्णालयातही अशीच निष्काळजीपणाची  घटना समोर आली असून कोरोना तपासणीच्या अहवालाची वाट न पाहता रुग्णाचा मृतदेह त्याच्या कुटूंबाकडे सोपविला. यानंतर शेकडो लोकांच्या उपस्थितीत कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नंतर, रुग्णालयात आलेल्या अहवालात मृताला कोरोना विषाणूची लागण झाल्याची बाब समोर आली. कोरोनाच्या वृत्ताची बातमी समजताच मृतांच्या कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाला याची माहिती होताच मृतांच्या 40 कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारात 500 हून अधिक लोक उपस्थित होते. या सर्व लोकांमध्ये आता कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोना अहवालाची वाट न पाहता त्यांनी मृतदेह त्यांच्या स्वाधीन का केला, शिवाय रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप परिवाराने केला आहे. यकृत निकामी झाल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, यकृताची समस्या उघडकीस आल्यानंतर अर्नाळा येथील 55 वर्षांच्या रुग्णाला वसईच्या कार्डिनल ग्रॅशियस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची कोरोना टेस्ट केली गेली, परंतु अहवाल येण्यापूर्वी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असता रूग्णाच्या मृतदेहासह हे कुटुंब अर्नाळा गावी पोहोचले. वसई तालुक्याचे आरोग्य अधिकारी बाळासाहेब जाधव म्हणाले की, ही बाब समजताच प्रशासनाचा रूग्णाच्या संपर्कात सर्वप्रथम संपर्क झाला. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे वाचा-गेल्या 80 दिवसात पहिल्यांदा पेट्रोल-डिजेलच्या किमतीत झाली वाढ; काय आहेत नवीन दर?
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या