बंगळुरु, 7 जून : प्रसिद्ध सँडलवूड अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा आज एका खासजी रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते 39 वर्षांचे होते.
अभिनेता चिरंजीवी सरजा हे बंगळुरुच्या सागर अपोलो रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारनंतर त्यांची प्रकृती अत्यंत ढासळली. सरजा यांनी कन्नड भाषेतील चित्रपट वायुपुत्र (2009) यातून करिअरची सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी काका सरजा यांच्यासह सहदिग्दर्शक म्हणून 4 वर्षे काम केले आहे. मे 2018 मध्ये चिरंजीवी यांनी मेघना राज यांच्यासह विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या निधनांमुळे कन्नड चित्रपटासृष्टीची मोठी हानी झाली आहे. अवघ्या 39 वयात त्यांनी अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे चाहत्यांना शोक अनावर झाला आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या अभिनयाचे लोक चाहते आहेत.
व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी चिरंजीवी सरजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या निधनाची माहिती देणारे एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, 'कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो फक्त 39 वर्षांचा होता. अभिनेत्याचा भाऊ ध्रुव सरजा आणि पुतणे अर्जुन सरजा आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. त्याच्या आत्मास शांती लाभो.
चिरंजीवी सरजा दक्षिणेतील अभिनेता अर्जुन सरजा यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी 2018 मध्येच प्रेमलीला जोशी आणि सुंदर राज यांची मुलगी मेघा राजशी लग्न केले. चिरंजीवीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 22 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात सिंगगा, अम्मा आय लव यू, चिररू, समहारा, राम-लीला, रुद्र तांडव यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
हे वाचा-मुंबईतील रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड; 500 जणांचे जीव धोक्यात
अंघोळीसाठी गेले वैनगंगा नदीपात्रात, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.