मराठी बातम्या /बातम्या /देश /

अभिनेत्रीचा भाजपला रामराम! म्हणाली, 'अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा यांसारख्या नेत्यामुळे सोडतेय पक्ष'

अभिनेत्रीचा भाजपला रामराम! म्हणाली, 'अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा यांसारख्या नेत्यामुळे सोडतेय पक्ष'

दिल्लीतील उत्तर-पूर्व भागात CAA च्या विरोधात आणि समर्थनार्थ झालेल्या प्रदर्शनांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये 40 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका अभिनेत्रीने या घटनांचा संदर्भ देत भाजपचा राजीनामा दिला आहे.

पुढे वाचा ...
    सुजीत नाथ, कोलकाता, 29 फेब्रुवारी : दिल्लीतील उत्तर-पूर्व भागात CAA च्या विरोधात आणि समर्थनार्थ झालेल्या प्रदर्शनांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये 40 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यादरम्यान 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका अभिनेत्रीने या घटनांचा संदर्भ देत भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे आणि भाजपला कायमचा रामराम ठोकला आहे. चित्रपट तसंच टीव्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या सुभद्रा मुखर्जी या बंगाली अभिनेत्रीने भाजपचा राजीनामा दिला आहे. बोऊ कोथा कोऊ, सधारन मेये, खिलाड़ी, रोमियो अँड जूलियट यामधून सुभद्रा मुखर्जी हा चेहरा घराघरात पोहोचला होता. खूप विचार केल्यानंतर हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया सुभद्रा यांनी दिली आहे. (हेही वाचा-हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला VIDEO) भाजपच्या कामांनी प्रभावित होऊन 2013 मध्ये पक्षामध्ये प्रवेश केल्याचं मुखर्जी सांगतात. त्यांनी पक्षाच्या सध्याच्या भूमिकेबाबत तक्रार व्यक्त केली आहे. मुखर्जी सांगतात की, ‘गेल्या काही वर्षात माझ्या लक्षात आलं की काहीही ठीक होत नाही आहे. धर्माच्या आधारावर एखाद्याचा तिरस्कार करणं आणि एखाद्याबाबत त्यावरूनच मत बनवणं ही भाजपची विचारधारा झाली आहे. याबाबत खूप विचार केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.’ या अभिनेत्रीने बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 'अनुराग ठाकुर आणि कपिल मिश्रांविरोधात कारवाई का नाही?' मुखर्जी यांनी सांगितलं की, ‘दिल्ली (Delhi) मध्ये काय होत आहे? कित्येक नागरिक मारले गेले आणि अनेकांची घरं जाळण्यात आली. या दंग्यांमुळे लोंकांना विभागलं आहे. पक्षाचे नेते अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांच्याविरोधात वादग्रस्त विधानांनंतरही कुणी कारवाई करत नाही आहे. दंग्याची दृश्य पाहून मी पूर्णपणे हादरले आहे. अशा पक्षामध्ये मला नाही राहायचं ज्याठिकाणी पक्षातील नेत्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही.’ त्या म्हणाल्या की, ‘ज्या पक्षामध्ये ठाकूर आणि मिश्रांसारखे नेते असतील त्या पक्षापासून मला दूर राहणं आवडेल.’ (हेही वाचा-दिल्ली : निर्दयीपणाचा बळी! मारहाण होत असताना राष्ट्रगीत गाणाऱ्या तरूणाचा मृत्यू) CAA बाबत मुखर्जी म्हणाल्या की, ‘शेजारच्या देशातील पीडितांना नागरिकत्त्व देणं, हा उत्तम निर्णय आहे. पण त्यांना नागरिकत्त्व देण्यासाठी भारतीयांच्या जीवाशी खेळ कशाला? आम्हाला आमचं नागरिकत्त्व सिद्ध करण्याची गरज काय? मी या निर्णयाचा निषेध करते. मला वाटत आहे की त्यामुळे मानवतेची हत्या करून असुरांना जन्म दिला जात आहे. यामुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. यामुळे केवळ दिल्लीतच नव्हे तर देशभरात अशांतता निर्माण होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Caa

    पुढील बातम्या