जाहिरात
मराठी बातम्या / देश / नोकरी सोडून केला 'हा' व्यवसाय; खुद्द पंतप्रधानांनी घेतली दखल

नोकरी सोडून केला 'हा' व्यवसाय; खुद्द पंतप्रधानांनी घेतली दखल

इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले होते.

इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले होते.

नातेवाईकांकडून 5 हजार 500 रुपये उधार घेऊन त्यांनी 6 पेट्यांपासून हा व्यवसाय सुरू केला. आज इतर शेतकऱ्यांसाठी ते जणू एक प्रेरणास्रोत बनले आहेत.

  • -MIN READ Local18 Haryana
  • Last Updated :

आशिष शर्मा, प्रतिनिधी यमुनानगर, 10 जून : ‘मध’ मानवी आहारात विशेष भूमिका बजावतं. 100 ग्रॅम मधातून 304 कॅलरी ऊर्जा मिळते. तसंच चरबी घटवण्यासाठीही मधाचा उपयोग केला जातो. हे सर्व उपयोग लक्षात घेता मधाच्या वाढत्या मागणीमुळे आज भारतात मधमाशीपालन व्यवसाय वेगाने वाढत आहे. पर्यायाने या व्यवसायातून प्रचंड उत्पन्नही होत आहे. हरियाणाच्या यमुनानगरात मधमाशीपालन व्यवसाय करणारे शेतकरी सुभाष कंबोज हे आज कोट्यवधींची कमाई करतात. शिवाय त्यांनी आपल्या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही रोजगार मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दोनवेळा त्यांचं कौतुक केलं होतं. इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले होते. सुभाष यांनी बी.एड पदवी घेऊन एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली होती. परंतु शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मन रमत नव्हतं. मग त्यांनी पशुपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मधमाशी पाळायची असं त्यांनी ठरवलं. नातेवाईकांकडून 5 हजार 500 रुपये उधार घेऊन त्यांनी 6 पेट्यांपासून हा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज देशाच्या अनेक राज्यांमध्ये ते मध निर्यात करतात. इतर शेतकऱ्यांसाठी ते जणू एक प्रेरणास्रोत बनले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

विशेष म्हणजे हरियाणा सरकारकडून नागरिकांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रचंड प्रोत्साहित केलं जातं. त्यासाठी मदत म्हणून अनुदानही दिलं जातं. मधमाशीपालनासाठी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदान दिलं जातं, तर मधमाशी खरेदी करणाऱ्यांना 75 टक्के अनुदान दिलं जातं. जपानी राजदूतांचा ‘पुणेरी बाणा’; पुण्यात काय काय केलंय पाहा VIDEO दरम्यान, मधमाशीपालनातून मेणाचं उत्पादन होतं. या मेणाचा वापर चर्म उद्योगात आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. मेणबत्ती बनवण्यासाठी मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो. त्याचबरोबर मधमाशा फुलांवरून पराग जमा करतात. परागामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. परागाचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात