पुणे, 09 जून : जपानी राजदूत भारत दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात आहेत. पुण्यात जाताच जपानी राजदूत एकदम पुणे कर बनले आहेत. पुण्यात त्यांनी आपला पुणेरी बाणा दाखवला आहे. तिथं जाऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. ज्याचा व्हिडीओही त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी भारत दौरा चांगलाच एन्जॉय करत आहेत. कधी उत्तर प्रदेशच्या वाराणसीत पाणीपुरी, लिट्टी-चोखा खाताना दिसले तर कधी मुंबई लोकलमधून प्रवास करताना आता ते पुण्यात आले आहेत. पुण्यात येण्याआधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मी पुण्याला भेट देणार आहे, इथं कोणकोणत्या गोष्टी करणं बेस्ट आहे, असं त्यांनी विचारलं होतं. नेटिझन्सनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी काही गोष्टी करून पाहिल्या. VIDEO - Oh So Cute! पुष्पा म्हणताच डॉगीने काय केलं पाहा; याच्यासमोर तर तुम्ही नक्कीच झुकाल अक्षरशः त्यांनी वडापाव आणि मिसळवरही ताव मारला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी चक्क मराठीत भाषणही केलं आहे.
I love street food of India🇮🇳
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 9, 2023
...but thoda teekha kam please!🌶️#Pune #Maharashtra #VadaPav pic.twitter.com/3GurNcwVyV
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ते रस्त्यावर वडापाव खाताना दिसले. वडापाव खात असताना त्यांना कुणीतरी मिरची देण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांनी ती तिखट म्हणून खाण्यास नकार दिला. पोस्टमध्येही त्यांनी सांगितलं की, मला इंडियन स्ट्रिट फूड आवडतं पण कमी मसालेदार. आणखी एका व्हिडीओत ते एका हॉटेलमध्ये मिसळपाव खाताना दिसले. तिथंही ते कमी तिखट चटणी कोणती ते विचारतात आणि तेच खातात.
Because many followers recommended me…!#MisalPav pic.twitter.com/PBDPERZAUw
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 9, 2023
याशिवाय एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली तिथं त्यांनी मराठीत भाषण केलं. सगळ्यांना नमस्कार असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. माझं नाव हिरोशी सुझुकी आहे. मी जपानचा राजदूत आहे. अशी त्यांनी आपली सर्वांना ओळख करून दिली.
Thank you for very warm welcome at the Golden jubilee of Eagle Burgmann India! pic.twitter.com/TNhSN7uAa7
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) June 9, 2023
तसंच पोस्टमध्ये त्यांनी आपलं स्वागत करण्याबाबत पुणेकरांचे आभारही मानले आहेत.