शारीरिक संबंधास नकार दिल्याचा राग, पतीनं आधी केली पत्नीची हत्या; मग मृतदेह पंख्याला लटकवला

शारीरिक संबंधास नकार दिल्याचा राग, पतीनं आधी केली पत्नीची हत्या; मग मृतदेह पंख्याला लटकवला

पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पतीनं तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर घटनेनंतर आरोपीने पत्नीच्या मृत्यूला आत्महत्येचे स्वरुप दिले.

  • Share this:

आझमगढ, 17 जून : एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला असताना दुसरीकडे गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यातच उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये धक्कादायक प्रकार घडला. पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर पतीनं तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर घटनेनंतर आरोपीने पत्नीच्या मृत्यूला आत्महत्येचे स्वरुप दिले आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तपासादरम्यान हा खून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पतीला अटक करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी आझमगढ जिल्ह्यातील मेहनाजपूर पोलीस स्थानकात एका महिलेची संशयास्पद परिस्थितीत हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला आत्महत्या म्हटलं होतं. पण अखेर मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला.

वाचा-मॉर्निंग वॉकसाठी दोघे बाहेर पडले ते परत आलेच नाही, यावलमध्ये धक्कादायक घटना

आझमगढचे एसपी त्रिवेणी सिंह यांनी सांगितले की, आरोपी राजूच्या पत्नीचे कोणाशी तरी गैरसंबंध असल्याचे त्याला संशय होता. या कारणामुळं पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. यातच दोन दिवसांपूर्वी पत्नीनं शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसल्याचं पतीला सांगितलं. यावर पती राजू संतापला. रागाच्या भरात त्यानं पत्नीची हत्या केली.

वाचा-लेकासोबत क्रिकेट खेळतानाच आला हार्ट अटॅक, रस्त्यावरच पडले बाबा आणि...

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितले की, पत्नीची हत्या केल्यानंतर राजूनं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही आत्महत्या असल्याचे दाखवले. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यानं मृतदेहाला पंख्याला लटकवले. पोलिसांच्या तपासणी दरम्यान त्याने सांगितले की पत्नीने आत्महत्या केली आहे. परंतु मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ही हत्या असल्याचे समोर आले. आझमगढपोलिसांनी राजूला अटक केली असून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला.

वाचा-चहा विकणाऱ्या तरूणाने लावला बँकेला करोडोंचा चूना, वाचा नेमकं काय घडलं

First published: June 17, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या