चहा विकणाऱ्या तरूणाने लावला बँकेला करोडोंचा चूना, वाचा नेमकं काय घडलं

चहा विकणाऱ्या तरूणाने लावला बँकेला करोडोंचा चूना, वाचा नेमकं काय घडलं

बँक ऑफ इंडियाच्या महाराजपूर शाखेमध्ये 4 महिन्यांपूर्वी झालेल्या दीड कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला अटक केली आहे.

  • Share this:

अमित गंजू, कानपूर, 17 जून : बँकेला चूना लावून ग्राहकांचे कोट्यवधी रुपये लंपास केल्याची घटना काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये घडली होती. कानपूरमधील महाराजापूर शाखेमध्ये 4 महिन्यापूर्वी ही घटना घडली. तपासाअंती आता खूप मोठा खुलासा या घटनेमध्ये झाला आहे. बँक ऑफ इंडियाच्या महाराजपूर शाखेमध्ये 4 महिन्यांपूर्वी झालेल्या दीड कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला अटक केली आहे. यानंतर याप्रकरणातील अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एक रुपरेखा आखली आहे. या भामट्यांनी ग्राहकांच्या खात्यातून एक कोटी 41 लाख रुपये लंपास केले होते. त्यामुळे जवळपास 2 डझन ग्राहकांना फटका बसला होता.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी 29 फेब्रुवारी रोजी रोजंदारीवर काम करणारा हा मजूर आणि त्याच्या कुटुंबीयांसह 11 जणांविरोधात खटला दाखल केला होता. या मजुराचं नाव पंकज गुप्ता असं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज गुप्ताने बँक कर्मचाऱ्यांचा पासवर्ड चोरला आणि ही रक्कम त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या खात्यात ट्रान्सफर केली. महाराजपूर पोलीस ठाण्यात अनेक महिने पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या खटल्याचा तपास अनेक महिने लांबला. अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 3 दिवसापूर्वी हे प्रकरण नरवलचे इन्स्पेक्टर राम अवतार यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

(हे वाचा-नदीतून वर आलं लुप्त झालेलं पुरातन मंदिर; महानदीत सापडला 500 वर्षांपूर्वीचा वारसा)

इन्स्पेक्टर राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांपूर्वी हे प्रकरण त्यांच्या हातात आले. यामध्ये पंकज गुप्ता आणि 11 जणांविरोधात खटला दाखल केला होता. त्यांनी सापळा रचून हाथीपूर गावात पंकज गुप्ताला पकडलं आणि त्याला तुरूंगात धाडण्यात आले आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आले होते तेव्हा महाराजपूर पोलिसांनी केवळ चौकशी करून पंकजला सोडले होते.

(हे वाचा-…आणि जवानांनी चक्क गाण्याच्या तालावर केलं ट्रेनिंग, हा भन्नाट VIDEO एकदा पाहाच)

राम अवतार यांना तपासामध्ये स्थानिकांनी अशी माहिती दिली की पंकजचे वडील पोलीस स्टेशनसमोर चहाचे दुकान चालवायचे आणि पंकजही तिथेच काम करायचा. ते 20 वर्षांपूर्वी फतेहपूरमधून हाथीपूरमध्ये वास्तव्यास आले होते. 5000 रुपयांची नोकरी करणारा पंकज वर्षभरात मालामाल झाला होता. सायकल ऐवजी कार चालवू लागल्याने तो संशयाच्या फेऱ्यात अडकला.

संपादन  - जान्हवी भाटकर

First published: June 17, 2020, 11:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या