CCTV VIDEO : लेकासोबत क्रिकेट खेळतानाच आला हार्ट अटॅक, रस्त्यावरच पडले बाबा आणि...

CCTV VIDEO : लेकासोबत क्रिकेट खेळतानाच आला हार्ट अटॅक, रस्त्यावरच पडले बाबा आणि...

लेकासोबत क्रिकेट खेळत असतानाच त्याच्या बाबांना हद्यविकाराचा झटका आला, जागीच त्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

सुरत, 17 जून : मृत्यू कसा येईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार गुजरातच्या सुरत इथं घडला. आपल्या लेकासोबत क्रिकेट खेळत असतानाच त्याच्या बाबांना हद्यविकाराचा झटका आला, जागीच त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना हे घडलं, त्यामुळं ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

विजय वरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृत्यू मार्च महिन्यात झाला. मात्र या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विजय आपल्या मुलासोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. मात्र अचानक त्यांना हद्यविकाराचा झटका आल्यानंतर ते जवळच असलेल्या दुचाकीवर कोसळतात आणि खाली पडतात. मुलानं शेजाऱ्यांना आवाज दिल्यानंतर लोकं जमा होतात.

वाचा-धक्कादायक! रेल्वेसमोर उडी मारण्याआधी मुलीने केला TikTok VIDEO

वाचा-दारूच्या दुकानात पाळलं खरं सोशल डिस्टन्सिंग, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

दरम्यान, शेजाऱ्यांनी विजय यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. विजय यांच्या मागे पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. ते सुरतमधील एका कॉलेजमध्ये पिऊनची नोकरी करत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये महाविद्यालये बंद असल्यामुळे गेले काही महिने ते घरीच होते.

वाचा-…आणि जवानांनी चक्क गाण्याच्या तालावर केलं ट्रेनिंग, हा भन्नाट VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. ही घटना दोन महिने आधी घडली असली तरी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published: June 17, 2020, 11:57 AM IST
Tags: cctv video

ताज्या बातम्या