मॉर्निंग वॉकसाठी दोघे घरातून बाहेर पडले ते परत आलेच नाही, यावलमध्ये धक्कादायक घटना

मॉर्निंग वॉकसाठी दोघे घरातून बाहेर पडले ते परत आलेच नाही, यावलमध्ये धक्कादायक घटना

फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेवून आत्महत्या केली.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

यावल, 17 जून : जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एका दाम्पत्याने  विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याने खळबड उडाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

भागवत उर्फ बाळु डिगंबर पाटील (वय61) आणि विमलबाई भागवत पाटील (वय 54) अशी मृतांची नावं आहे.  सकाळी  5.45 वाजेच्या सुमारास पाटील दाम्पत्याने मार्निंग वॉकला जात आहे, असे सांगून घरातून बाहेर निघाले होते.

घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर दूर हे दाम्पत्य चालत गेले. त्यानंतर फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेवून आत्महत्या केली.

'घराणेशाही फक्त बॉलिवूडच नाही मराठी इंडस्ट्रीतही' दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

सदरील प्रकार रस्त्यावरून ये–जा करणाऱ्या लोकांच्या निर्दशनास आला.  त्यानंतर त्यांनी याबद्दल पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाटील दाम्पत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

भागवत पाटील आणि विमलबाई पाटील या दोघांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

मुक्ताईनगरमध्ये माजी सभापतीची निर्घृण हत्या

दरम्यान,  जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोलपंपाच्या परिसरामध्ये डी.ओ. पाटील यांची  हत्या करण्यात आली.

चीननं भारताचा कसा केला विश्वासघात? जवानांनी सांगितली गलवान खोऱ्यातली कहाणी

आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव या परिसरात जमला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 12:31 PM IST

ताज्या बातम्या