सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 18 जून : उत्तर प्रदेशच्या अयोध्येत एका बाजूला बहुप्रतीक्षित राम मंदिराची स्थापना होतेय, तर दुसऱ्या बाजूला अयोध्या धाम रेल्वे स्थानक बनून तयार आहे. तसंच श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे. अशा अनेक कोट्यवधींच्या योजना अयोध्येला वैभवशाली शहर बनवण्यासाठी आखण्यात आलेल्या आहेत. अयोध्येच्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशची जबाबदारी योगी आदित्यनाथ सरकारने सांभाळल्यापासून अयोध्येची भरभराट होऊ लागली आहे. त्यांनी अयोध्येकडे विशेष लक्ष दिलं आहे. ते जेव्हा-जेव्हा याठिकाणी भेट देतात तेव्हा-तेव्हा महत्त्वपूर्ण घोषणा करतात. सध्या अयोध्येत जवळपास 32,000 कोटींच्या योजनांचं काम सुरू आहे.
येथील धार्मिक स्थळांवरही विशेष खर्च केला जातोय. अयोध्या रिंग रोडसह अनेक रस्त्यांचं कामही सुरू आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राम मंदिरात जाण्यासाठी 3 रस्त्यांचं बांधकाम करण्यात येत आहे, जे यंदा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. Uddhav Thackeray : अमित शाहांचे ते 4 प्रश्न, प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंचा पलटवार! तर, अयोध्या रेल्वे स्थानकाच्या बांधकामात पहिल्या भागासाठी जवळपास 240.89 कोटी रुपये आणि दुसऱ्या भागासाठी जवळपास 484 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. शिवाय अयोध्येकडील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, राममंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत अयोध्येचं पूर्ण रुपडंच पालटणार, असं म्हणायला हरकत नाही.