मुंबई, 18 जून : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईत पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा समाचार घेतला. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या जाहीर सभेमध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले होते, या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. काय म्हणाले होते अमित शाह? ‘कलम 370 हटवलं हे योग्य केलं का नाही? राम मंदिर उभारणी करता ते योग्य करता की नाही? मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही, मुस्लिम आरक्षण पाहिजे का नाही? युतीची बोलणी करायला गेलो होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार, असं उद्धव ठाकरे यांनीदेखील सांगितलं होतं, असं झालं का नाही? असे चार प्रश्न अमित शाह यांनी विचारले होते. आमदार-खासदार गेले पण उद्धव ठाकरेंना आणखी संशय, सोबत असलेले ‘खबरे’ कोण? उद्धव ठाकरेंची उत्तरं ‘आम्ही काँग्रेससोबत गेलो, कारण तुम्ही आम्हाला ढकललंत म्हणून जावं लागलं. तेव्हा युती होती, आम्ही मोदींचा चेहरा लावला तुम्ही बाळासाहेबांचा लावलात. आज मी आव्हान देतोय तुम्ही मोदींचा चेहरा घेऊन या, आम्ही माझ्या वडिलांचा घेऊन येतो, बघू कोण जिंकतंय. कर्नाटकमध्ये मोदींचाच चेहरा लावला होता. मग मोदींचा चेहरा, मोदींची जादू कुठे गेली?’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ‘370 कलम काढलं तेव्हा पाठिंबा देणारी शिवसेना होती. ५-६ वर्ष झाली अजून काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही? याचं उत्तर अमित शाह यांनी द्यावं. अजूनही हिंदू असुरक्षित का आहे?’ असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला. इच्छा नव्हती तरी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. आव्हान होतं, परतीचे दोर कापले होते. अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. अरविंदने माझं काय चुकलं असं विचारलं नाही. जाऊन राजीनामा दिला, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. समान नागरी कायदा आणा आमचा पाठिंबा आहे. संपूर्ण देशभरात गोवंश बंदी कायदा आणू शकत नाही, समान नागरी कायदा काय आणणार? आम्ही असताना महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम दंगली का झाल्या नाहीत? काश्मीर आणि मणिपूरमध्ये जाऊन हिंदू जनआक्रोश करा, कारण तिकडेही हिंदूच मरत आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. ‘पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत, पण त्यांनी…’, उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.