मराठी बातम्या /बातम्या /देश /OPINION: दीदींच्या बंगाल विजयाने शरद पवारांना बसू शकतो धक्का; UPA ची सूत्र ममतांकडे जायची शक्यता

OPINION: दीदींच्या बंगाल विजयाने शरद पवारांना बसू शकतो धक्का; UPA ची सूत्र ममतांकडे जायची शक्यता

शरद पवार यांनी बंगाल विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं असलं आणि भाजपला टोमणा मारला असला तरी दीदी आता पवारांवर शिरजोर होत UPA ची सूत्र त्यांच्याकडे जायची शक्यता आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांचं विश्लेषण

शरद पवार यांनी बंगाल विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं असलं आणि भाजपला टोमणा मारला असला तरी दीदी आता पवारांवर शिरजोर होत UPA ची सूत्र त्यांच्याकडे जायची शक्यता आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांचं विश्लेषण

शरद पवार यांनी बंगाल विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं असलं आणि भाजपला टोमणा मारला असला तरी दीदी आता पवारांवर शिरजोर होत UPA ची सूत्र त्यांच्याकडे जायची शक्यता आहे. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांचं विश्लेषण

    रशीद किडवई

    कोलाकाता, 3 मे : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका दिवसाच्या आताच ममता बॅनर्जींकडे (Mamata Banerjee)  संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA)अध्यक्षपद किंवा समन्वयकपद देण्याचं नियोजन सुरू झालं आहे. थोडक्यात सांगायचं झालं, तर बिगर भाजप (BJP) आणि एनडीएमध्ये (NDA) नसलेल्या राजकीय शक्तीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सध्या सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा (Sonia Gandhi UPA chairperson) आहेत. वर उल्लेखलेलं नियोजन अगदीच प्राथमिक स्थितीत असलं, तरी अधिकृतरीत्या काँग्रेस पक्ष आणि पक्ष नेतृत्वाशी असलेले मतभेद उघडपणे मांडणारा जी-23 गट या दोन्हींचे आशीर्वाद त्याला लाभले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेसमधल्या या G-23 गटाने सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्वशैलीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते.

    पडद्यामागे घडामोडी सुरू झाल्या आहेत. टेलिफोनवर चर्चा सुरू आहेत. डिसेंबर 2020 मध्ये ज्या 'दूता'ने G-23 गटाला सोनिया गांधींच्या घरी आणलं होतं, तोच दूत आता UPA च्या नेतृत्वासाठी ममता बॅनर्जींची मनधरणी करण्यासाठी सक्रियपणे काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. संजय गांधींच्या काळात याच दूताने ममता यांचं नाव भारतीय युवक काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं समजतं.

    हे नियोजन बहुपेडी आहे. त्यातून काँग्रेसचं राजकीय नेतृत्व गांधी परिवाराकडेच राहील. अधिक स्पष्ट शब्दांत सांगायचं, तर यूपीएचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ममतांना आमंत्रण देण्यासाठी 10,जनपथ कडून पुढाकार घेतला जात आहे.

    "मोठ्या मनाने निकाल स्वीकारायला हवा होता, पण रडीचा डाव सुरू आहे"; शरद पवारांचा भाजपवर निशाणा

     काँग्रेस (Congress) त्यांच्या पूर्वीच्या चिंतन शिबिरांशिवायच सध्या आत्मपरीक्षणाच्या (Introspection) स्थितीत आहे. वेगवेगळे पर्याय चाचपले जात आहेत. दिल्लीत 2015 आणि 2020, तसंच आंध्र प्रदेशात 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आता 2021मध्ये पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

    नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना नेतृत्वाबद्दलचं आव्हान उभं करण्यातली निरर्थकता उमजली आहे. कारण निवडणुकीच्या राजकारणात ते फायदेशीर नाही. राहुल गांधी किंवा नेहरू-गांधी कुटुंबातल्या सदस्याचं महत्त्व पक्षाला अखंड ठेवण्यासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रश्न उपस्थित करण्याच्या सोनिया-राहुल यांच्या क्षमतेमुळे ओळखलं गेलं आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या गांधी कुटुंबाशी असलेल्या दृढ संबंधांमुळेही जी-23गटातल्या नेत्यांना शांत करण्यासाठी थोडा परिणाम झाला आहे.

    नंदीग्राममधील पराभवानंतरही ममतादीदी CM बनणार? जाणून घ्या संविधानातील तरतुदी

    सध्या कोविड स्थिती हाताळण्याच्या बाबतीत आणि पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर भाजपला घेरता येणं शक्य आहे. म्हणून 2024 मध्ये त्या पक्षालासत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज वाटते आहे.

    ममता बॅनर्जींना यूपीएचं अध्यक्षपद देण्याच्या नियोजनाला सोनिया गांधींकडूनदुजोरा मिळाला,तर राहुल गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसवण्याचाप्रयत्न होऊ शकतो,असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं. राहुल गांधी संसद आणिसंघटनात्मक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतील,तर प्रियांका गांधीपक्षाच्या कँपेनर आणि आघाडीसाठी भेटीगाठी करणाऱ्या व्यक्ती म्हणून भूमिका निभावतील.

    डावे पक्ष ममतांच्या विजयातच मशगूल; मोदींविरोधातला चेहरा म्हणून दीदींकडे नजरा

    संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युनायटेड प्रोग्रेसिव्हअलायन्स (United Progressive Alliance) 2014पासून सुप्तावस्थेत आहे.2004मध्ये तिची स्थापना झाली होती.2014मध्ये डॉ. मनमोहनसिंग (Dr Manmohan Singh) पंतप्रधानपदावरून पायउतार होईपर्यंत ती कायम राहिली. तेव्हाच्या पराभवाची तीव्रता एवढी होती, की यूपीए पुनरुज्जीवित होऊ शकली नाही. NDA मध्ये नसलेले पक्ष मात्र बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी निवडणुकांत एकत्र आले. पूर्वी केरळ, तमिळनाडू आणि जम्मू-काश्मिरात काँग्रेसचे मित्रपक्ष होते.

    सोनिया गांधींनी 23मे रोजी यूपीएची बैठक बोलावल्याचं वृत्त लोकसभा निकालाच्या तीन दिवस आधी 20 मे 2019रोजी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी फेटाळून लावलं होतं. त्यावरून असं लक्षात आलं होतं, की एकत्रित विरोधी पक्ष (Umbrella Opposition Parties) अशा भूमिकेपेक्षा केवळ सत्तास्थापनेतले सहकारी असंच यूपीएचं लॉजिक आहे.

    Corona काळात धनंजय मुंडेंचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय, तुम्हीही कराल कौतुक

    आता मात्र एकत्रित विरोधी पक्ष ही कल्पना पुनरुज्जीवित केली जात आहे; मात्र स्वतःकडे यूपीएचं अध्यक्षपद किंवा समन्वयकपद घेण्यासाठी ज्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यात शरद पवारांचं यात कुठेही नाव दिसत नाही. एक प्रकारे शरद पवारांच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींच्या बंगाल विजयाने सुरुंगच लावला गेला आहे.

    (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक आहेत.)

    First published:
    top videos

      Tags: Mamata banerjee, Sharad pawar, UPA, West Bengal Election