मराठी बातम्या /बातम्या /देश /

"मोठ्या मनाने निकाल स्वीकारायला हवा होता, पण रडीचा डाव सुरू आहे"; शरद पवारांचा भाजपवर निशाणा

"मोठ्या मनाने निकाल स्वीकारायला हवा होता, पण रडीचा डाव सुरू आहे"; शरद पवारांचा भाजपवर निशाणा

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली आहे.

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली आहे.

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 2 मे: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) मतदारांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस (TMC)ला बहुमताने विजयी केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवताच संपूर्ण देशातून ममता बॅनर्जीं (Mamata Banerjee)वर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. मात्र, त्याच दरम्यान ममता बॅनर्जीच पराभूत झाल्याचा निकाल समोर आला आणि सर्वांनाच एक धक्का बसला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणतात हा तर रडीचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट (Sharad Pawar tweet) करत म्हटलं, "पश्चिम बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या जनतेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय त्याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!." अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. नंदीग्रामध्ये सुपर ओव्हरचा थरार! शेवटच्या क्षणापर्यंत दीदी वि. शुवेंदू सामना असा रंगला बंगाल मिळवण्यात भाजपला अपयश  पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची असलेली सत्ता घालवून आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी स्ट्रॅटेजी आखली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी उतरले होते. भाजपचे दिल्लीतील अनेक दिग्गज नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते मात्र, असे असले तरीही बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसच्या पदरातच मते टाकून भाजपला नाकारले आहे. विजयी झालेल्या ममतांना पराभवाचा झटका पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहूमत मिळवलं. इतकेच नाही तर स्वत: ममता बॅनर्जी यांनीही नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, सायंकाळच्या सुमारास माहिती समोर आली की, ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. विजयी होऊनही ममता पराभूत, DMK चा दणका; विधानसभा निवडणूक निकालांची वैशिष्ट्ये एका क्लिकवर नेमकं घडलं तरी काय? सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ममता बॅनर्जी विजयी झाल्याची माहिती समोर आली. ममता बॅनर्जी यांनी 1200 मतांनी भाजप उमेदवार शुवेंदू अधिकारी यांचा पराभव केल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात ममता बॅनर्जी पराभूत झाल्याचं वृत्त समोर आलं. अखेर 7.30 वाजण्याच्या सुमारास ममता बॅनर्जी पराभूत झाल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. शुवेंदू अधिकारी यांनी 1737 मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.
First published:

Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, Sharad pawar

पुढील बातम्या