मराठी बातम्या /बातम्या /देश /नंदीग्राममध्ये पराभव; ममतादीदींना CM बनण्यासाठी पुन्हा लढवावी लागणार निवडणूक? जाणून घ्या संविधानातील तरतुदी

नंदीग्राममध्ये पराभव; ममतादीदींना CM बनण्यासाठी पुन्हा लढवावी लागणार निवडणूक? जाणून घ्या संविधानातील तरतुदी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राममधून  (Nandigram) पराभूत झाल्या आहेत. मात्र, तरीही त्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राममधून (Nandigram) पराभूत झाल्या आहेत. मात्र, तरीही त्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राममधून (Nandigram) पराभूत झाल्या आहेत. मात्र, तरीही त्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

नवी दिल्ली 03 मे : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या नजरा खिळलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा निकाल (West Bengal Assembly Elections Result) समोर आला असून तृणमूल काँग्रेसनं (Trinamool Congress) मोठा विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाचा पराभव केला असला तरी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राममधून (Nandigram) पराभूत झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील हॉट सीट मानल्या जाणाऱ्या नंदीग्राममध्ये जसा अंदाज लावला जात होता तसाच निकाल समोर आला आहे. सुरुवातीला तर हेच स्पष्ट होऊ शकलं नाही की नंदीग्राममधून शुवेंदु अधिकारी यांचा विजय झाला आहे की ममता बॅनर्जींनी बाजी मारली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचा दावा केला होता, मात्र नंतर ममता यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपल्या पराभवाची माहिती दिली.

अमित शहांचा राजीनामा मागणाऱ्या नवाब मलिकांना दरेकरांचे प्रत्युत्तर

यानंतर तृणमूलनं केलेल्या ट्विटनं आणखीच गोंधळात टाकलं. यात दावा करण्यात आला, की आणखी मतमोजणी सुरू आहे. जर ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून पराभव झाला आहे, तर त्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहाणार का, असा सवाल उपस्थित होतो. निवडणूक विश्लेषकांचं असं म्हणणं आहे, की ममता बॅनर्जी निश्चितपणे पुन्हा एकदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. बघायला गेल्यास भारतातील तीन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री नितीशकुमार, योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत मात्र विधानसभेचा भाग नाहीत. सरळ शब्दात सांगायचं झाल्यात मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या नाहीत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही सार्वत्रिक निवडणूक लढविली नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत असं नाही. तरीही तृणमूल काँग्रेसने अशी रचना तयार करण्याविषयी बोललं आहे.

कलम 164 नुसार, जो मंत्री सलग सहा महिने एखाद्या राज्याच्या विधानसभेचा भाग नसतो तो या कालावधीची मुदत संपल्यानंतर मंत्री होऊ शकत नाही. याचा अर्थ ममता बॅनर्जी यांना खासदार होण्यासाठी 6 महिन्यांचा अवधी आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांना 6 महिन्यांत एखाद्या रिकाम्या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल आणि पोट-निवडणूक जिंकून खासदार व्हावे लागेल.

First published:
top videos

    Tags: Cm west bengal, Mamata banerjee, West Bengal Election