मराठी बातम्या /बातम्या /देश /

'पाच वर्ष बंगालला उद्ध्वस्त केलं', मोदींचा ममतादीदींवर जोरदार हल्लाबोल

'पाच वर्ष बंगालला उद्ध्वस्त केलं', मोदींचा ममतादीदींवर जोरदार हल्लाबोल

'ममतादीदी आणि त्यांच्या लोकांनी पश्चिम बंगालचा विकास केला नाही, लोकांचा विश्वासघात केला, बंगालचा अपमान केला आहे'

'ममतादीदी आणि त्यांच्या लोकांनी पश्चिम बंगालचा विकास केला नाही, लोकांचा विश्वासघात केला, बंगालचा अपमान केला आहे'

'ममतादीदी आणि त्यांच्या लोकांनी पश्चिम बंगालचा विकास केला नाही, लोकांचा विश्वासघात केला, बंगालचा अपमान केला आहे'

  • Published by:  sachin Salve

बंगाल, 07 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Election 2021) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांनी 'भारत माता की जय' घोषणा देत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ममतादीदींनी (mamta banerjee) बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. माँ, माटी मानुषची घोषणा देऊन बंगालाला उद्ध्वस्त केलं, अशी टीका मोदींनी केली.

ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडली. 'भारत माता की जय, वंदे मातरम्' म्हणत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.

'बंगालच्या लोकांनी ममतादीदी यांच्यावर विश्वास ठेवला होता. पण ममतादीदी आणि त्यांच्या लोकांनी पश्चिम बंगालचा विकास केला नाही, लोकांचा विश्वासघात केला. बंगालचा अपमान केला आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार केले. ती लोकं कधीच लोकांचा विश्वास पुन्हा जिंकू शकत नाही, असा टोला मोदींना लगावला.

वर्गात रागावून ओरडल्यानं नाराज, बारावीच्या मुलानं केला शिक्षकावर गोळीबार

'बंगालच्या लोकांना आता शांतता हवी आहे, विकास हवा आहे, ब्रिगेड ग्राऊंडमध्ये लोकांनी केलेली गर्जना आता कुणालाही संशय ठेवण्याची गरज नाही. 'भारत माता की जय'ची घोषणा बंगालच्या कानाकोपऱ्यात जाऊ द्या, बंगालमधील प्रत्येक लोकांना परिवर्तन करण्याची इच्छा आहे. मी तुम्हा सर्वांना पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करण्याचा विश्वास देतो, बंगालमध्ये गुंतवणूक, शांतता, संस्कृती, प्रथा आणि परंपरा कायम राखण्यासाठी विश्वास देतो. महिला आणि मुलींच्या विकासासाठी, मेहनतीने काम करण्यासाठी इथं आलो आहे. आम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वप्नासाठी  काम करण्याचे आश्वासन देण्यासाठी मी इथं आलो आहे,  तुमची सेवा आणि परिश्रम करण्यासाठी भाजप सरकार स्थापन करण्याचा आमचा विश्वास आहे. परिवर्तन करण्याचा विश्वास मी तुम्हाला देतो. बंगालमध्ये अशोल विकास परिवर्तन करण्याचे आश्वासन आम्ही देतोय. 'अशोल परिवर्तन' म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळेल, तरुणांना नोकऱ्या मिळेल, उद्योजकांना चालना मिळेल, महिला आणि मुलींचं रक्षण केले जाईल, असं आश्वासन मोदींनी दिले.

राज ठाकरेंमुळे कोरोना वाढला'; धक्कादायक आरोप करीत पोलीस ठाण्यात केली तक्रार

'माँ, माटी, माणुष अशी घोषणा ममतादीदींनी दिली होती. मागील 10 वर्षांमध्ये सर्वसामान्य बंगाली लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे का? जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली आहे का? शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली आहे का? गरीब आणखी गरीब होण्याचे काम तृणमूल सरकारने केले आहे. गुंतवणूक, उद्योग क्षेत्रात कोणतेही परिवर्तन झाले नाही.  माँ, माटी माणुष ची परिस्थितीत बंगालमधील लोकांना माहिती आहे. आज माँवर हल्ले होत आहे. महिला आणि मुलींवर अत्याचार झाले आहे, अशी टीका मोदींनी केली.

'मातीवर तृणमूलला बोलण्याचे काम नाही. काळेबाजार, हफ्तेखोर, सिंडिकेटच्या हातात बंगालला सोपवले आहे. बंगालची माणसं आपल्या या भूमीला लुटताना आणि तिचे लचके तोडताना पाहात आहे. त्यामुळे आज प्रत्येक बंगाली ' आर ना यो आर ना यो' अशी घोषणा देत आहे, हा तृणमूल सरकारच्या शेवट आहे, अशी टीकाही मोदींनी केली.

'तुम्ही पूर्ण भारताची बेटी आहात, काही दिवसांपूर्वी तुम्ही स्कुटी सांभाळली. सगळे जण प्रार्थना करत होते की, सगळी काही ठीक व्हावं, तुम्हाला कुठे दुखापत होऊ नये. सुदैवाने तुम्हाला कुठेही दुखापत झाली नाही. जर स्कुटरवर तुम्हाला कुठे दुखापत झाली असती तर ज्या राज्यात स्कुटर तयार झाली त्या राज्याशी तुम्ही दुश्मनी केली असती, असा टोला पंतप्रधान मोदींना लगावला.

राष्ट्रवादीच्या नेत्याला राज ठाकरेंची काळजी; खुलं पत्र लिहून केलं आवाहन

'दीदी तुम्हाला बंगालची जनता एकच प्रश्न विचारत आहे. दीदीच्या भूमिकेत तुम्हाला जनतेनं पाहिलं होतं पण तुम्ही स्वत: ला एकाच पुतण्याची आत्या होण्याचा काम का केले. बंगालमधील लाखो पुतण आहे त्यांच्यासाठी तुम्ही काम का नाही केलं, तुम्ही सुद्धा भाई-भतिजे या काँग्रेसच्या घराणेशाही नातेवाईकवादाला खतपाणी घातले' अशी टीकाही मोदींनी केली.

'उत्तर बंगाल असो किंवा पश्चिम बंगाल असो जे काही बंगालकडून हिसकावून घेण्यात आले आहे, ते परत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. आज भारत आपल्या स्वतंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज बंगाल नव्या ऊर्जा आणि क्षमतेनं तो पुढे जाणार आहे. बंगालच्या पुढील 25 वर्षांच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ही पाच वर्ष बंगालच्या पुढील 25 वर्ष विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे' असंही मोदी म्हणाले.

'बंगालच्या मेट्रोच्या कामाला आता मोठी चालना मिळणार हे. केंद्र सरकारने हातभार लावल्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे आणखी गतीने काम केले जाणार आहे.  भाजप सरकार आल्यावर बंगालमध्ये पूल उभारले जाईल. गरिबांना घरं मिळतील. घर घेणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात येईल. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत बंगालमध्ये विकास केला जाईल. पश्चिम बंगालमध्ये केंद्रातील योजनांना इथं लागू करण्यात येईल' असं आश्वासनही मोदींनी दिलं.

महाविकास आघाडीची आज कॅबिनेट बैठक, विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा गाजणार?

'पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाले पाहिजे, एवढाच आमचा हेतू नाही. पश्चिम बंगालला विकासाच्या राजकारणाकडे न्यायचे आहे.  गेली पाच वर्ष पश्चिम बंगालची वाया गेली आहे पण आता पश्चिम बंगालला बरबाद होऊ द्यायचे नाही, यासाठी कुणाच्याही हातात सत्ता द्यायची नाही, असोल परिवर्तन करायचे आहे. पश्चिम बंगालच्या लोकांचा छळ करण्यात आला आहे, त्यांना चांगले दिवस द्यायचे आहे' असंही मोदी म्हणाले.

'स्वातंत्र्याच्या काळात काम केल्यामुळे काँग्रेस सत्तेत आलं. त्यांनी काही काळ काम केले. बंगालमध्ये वामपंथीयांनी नारा दिला होता, काँग्रेसचे हात काळे आहे. पण आज हेच वामपंथीय काँग्रेसला हात धरून आहे' अशी टीकाही मोदींनी केली.

First published:

Tags: Assembly Election 2021, Narendra modi