महाविकास आघाडीची आज कॅबिनेट बैठक, विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा गाजणार? 

महाविकास आघाडीची आज कॅबिनेट बैठक, विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा गाजणार? 

काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद सध्या रिक्त असून निवडणूक घ्यावी यासाठी आग्रही काँग्रेस पक्ष आग्रही आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : काँग्रेस पक्षाकडे (Congress) विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) सध्या रिक्त असून निवडणूक घ्यावी यासाठी आग्रही काँग्रेस पक्ष आग्रही आहे. महाविकास आघाडी सरकारची (MVA Goverment) आज सायंकाळी साडेपाच वाजता सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे कॅबिनेट बैठक (Cabinet meeting) होत असून या बैठकीच्या कालावधीत दरम्यान काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्दा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅबिनेट बैठकीवर अधिकृतरित्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक हा अजेंडा नसला तरी आयत्या वेळेस या विषयावर चर्चा मुद्दा काँग्रेस पक्ष काढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.

आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील  कोरोना संख्या आणि विधिमंडळ सदस्य आमदार, कोरोनाबाधित संख्या यावर चर्चा केली जाणार आहे. बहुमताचा आकडा महाविकास आघाडी जवळपास पूर्ण करत असल्यास तात्काळ विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासाठी काँग्रेस आग्रही भूमिका कॅबिनेट बैठकीत मांडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ममत्व आणि कर्तव्याचा संगम; स्वरानं शेअर केला वर्दीतील झाशीच्या राणीचा व्हिडीओ

आजच्या बैठकीत अर्थसंकल्पास मंजुरी देखील मिळेल, कारण उद्या सोमवारी अधिवेशनात बजेट मांडले जाणार आहे. अधिवेशन कालावधी विधानसभा, अध्यक्षपद निवडणूक घ्यावी यासाठी आग्रही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अधिवेशन कालावधीमध्ये यासंदर्भात अधिकृत निर्णय घेतला जावा, अशी भूमिका यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली होती.

यापूर्वी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी देखील भूमिका स्पष्ट करताना म्हटले  होते की, 'काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्ष पद होते. आता हे पद रिक्त असल्याने काँग्रेस या पदाच्या निवडणुकीसाठी आग्रही असणार आहे. सध्या विधिमंडळावर कोरोना संकट आहे, अशा परिस्थितीत जर बहुमताचा आकडा जवळपास स्पष्ट महाविकास आघाडी करत असेल तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे? अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

SEX CD प्रकरणानंतर धास्तावलेल्या सहा भाजप मंत्र्यांची कोर्टात धाव

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानच जर ही निवडणूक लागली तर काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष उमेदवार कोण हे जवळपास निश्चित झालेले आहे. ज्यावेळेस निवडणूक अधिकृतरीत्या जाहीर होईल, त्यावेळेस काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करेल, असे ही काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितले.

Published by: sachin Salve
First published: March 7, 2021, 2:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या