जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'राज ठाकरेंमुळे कोरोना वाढला'; धक्कादायक आरोप करीत पोलीस ठाण्यात केली तक्रार

'राज ठाकरेंमुळे कोरोना वाढला'; धक्कादायक आरोप करीत पोलीस ठाण्यात केली तक्रार

'राज ठाकरेंमुळे कोरोना वाढला'; धक्कादायक आरोप करीत पोलीस ठाण्यात केली तक्रार

राज ठाकरे यांच्याविरोधात धक्कादायक आरोप करण्यात आला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 7 मार्च : राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला (because of Raj Thackeray Corona  increasing) असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. रत्नाकर चौरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (because of Raj Thackeray Corona increasing lawyer lodged a complaint in police station) मराठी भाषा दिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मास्क लावणं टाळलं होतं. याशिवाय नाशिक येथे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माजी महापौराला मास्क लावण्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. यामुळे राज ठाकरे यांचं मास्क प्रकरण बरंच चर्चेत आहे. माध्यमांसमोर राज ठाकरे यांनी  मी मास्क  घालणार नाही असे वक्तव्य केले होते. हे ही वाचा- पुन्हा कोरोनाचा धोका? महाराष्ट्रातील प्रवाशांवर शेजारील राज्याने लावले निर्बंध 5 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. राज ठाकरे यांचं  स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क लावले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केला.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात