काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेताचा पक्षाला रामराम; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे दिले संकेत

काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेताचा पक्षाला रामराम; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे दिले संकेत

केरळ राज्यातील कॉंग्रेसचे (INC) वरिष्ठ नेते पीसी चाको (PC Chacko) आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (National Congress Party) प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 16 मार्च: केरळ राज्यातील कॉंग्रेसचे (INC) वरिष्ठ नेते पीसी चाको (PC Chacko) आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (National Congress Party) प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. या नव्या पक्षात त्यांची जबाबदारी काय असेल याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Kerala Assembly Election) तोंडावर बुधवारी वरिष्ठ नेते पीसी चाको यांनी पक्षाला रामराम (PC Chacko Resign from Party) ठोकण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गटबाजी झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

गेल्या वर्षी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी पक्षाशी काडीमोड घेतल्यानंतर पीसी चाको हे पक्ष सोडून गेलेले दुसरे वरिष्ठ नेते आहेत. चाको यांनी कॉंग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलं आहे.

यावेळी चाको म्हणाले की, त्यांनी आपला राजीनामा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पार्टी सोडण्याचा विचार करत होतो, असंही ते यावेळी म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, 'कॉंग्रेस पक्षात आता लोकशाही शिल्लक राहिली नाही. निवडणूकीच्या मैदानात उतरवल्या गेलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत प्रदेश कॉंग्रेस कमिटीशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

केरळमध्ये 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी देताना दोन गटांनी गैर लोकशाही मार्गाने उमेदवारी दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याचे संकेत स्वतः चाको यांनी दिले आहेत. त्यामुळे केरळ कॉंग्रेसच्या अडचणींत आता आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.

(वाचा -राज्य सरकार आणि कोरोनाचे प्रेमसंबंध आहेत का? मनसे नेत्याचा अजब सवाल)

याबाबत माहिती देताना पी सी चाको यांनी सांगितलं की, केरळमध्ये डाव्या आघाडीला पाठिंबा देणं हा माझा मुख्य हेतू आहे. पण तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याव्यतिरिक्त आज सायंकाळी 5.30 वाजता सीपीएमचे महासचिव सीताराम यचुरी यांची भेट घेणार आहे, तर त्यानंतर सायंकाळी 7 वाजता गुलाम नबी आझाद यांची भेट घेणार आहे. या भेटीत कशाबद्दल चर्चा करणार आहेत. याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही.

Published by: News18 Desk
First published: March 16, 2021, 2:42 PM IST

ताज्या बातम्या