नवी दिल्ली, 11 मार्च : दिल्ली हिंसाचारावरून सरकारला घेरत आज लोकसभेत विरोधी पक्षांनी पुन्हा गोंधळ घातला. असदुद्दीन ओवेसी, अधीररंजन चौधरी आदींनी केंद्र सरकारवर दंगलींबद्दल सरकारला जबाबदार धरून अनेक प्रश्न उपस्थित केले. दिल्लीत हिंसाचार भडकला होता, त्यावेळी दिल्ली पोलीस काय करत होते, असाही सवाल करण्यात आला. दिल्ली हिंसाचारासंबंधीच्या सर्व आक्षेपांना, टिकेला आणि प्रश्नांना उत्तरं देताना अमित शहा म्हणाले, "दंगलींवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 25 तारखेनंतर एकही हिंसाचाराची घटना झालेली नाही."
"दिल्लीत एका मोठ्या पक्षाची रॅली झाली. त्यामध्ये घोषणा दिल्या गेल्या. घर से बाहर निकलो. यह आर या पार की लडाई है... हे तुम्हाला भडकावू भाषण वाटत नाही का?" असं विचारत अमित शाहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Union Home Minister Amit Shah on CAA: Ek badi party ki rally hui, "Ghar ke bahar niklo", "Yeh aar paar ki ladai hai" kaha gaya, yeh hate speech nahi lagti aapko? https://t.co/y3LMsiDWXL
— ANI (@ANI) March 11, 2020
दिल्ली पोलीस काय करत होते?
'काही विरोधी पक्षांनी दिल्ली पोलिसांच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित केली', असं म्हणत अमित शहा यांनी दंगल झाली त्या वेळी दिल्ली पोलीस काय करत होते हे स्पष्ट केलं. "पोलिसांवर टीका करणाऱ्यांना मला हे सांगायचं आहे की, दंगल भडकत होती, त्यावेळी पोलीस रस्त्यावर झुंजत होते. त्यांचं काम अजून संपलेलं नाही. सत्य कोर्टासमोर ठेवायचं आहे. त्यासाठी ते पुरावे गोळा करत आहेत. त्यामुळे टीका करताना विरोधकांनी वास्तवाचं भान राखायला हवं", असं शाहा म्हणाले.
दिल्ली पोलिसांची केली प्रशंसा
विरोधकांनी टीका केली असली, तरी अमित शाहा यांनी मात्र सभागृहात दिल्ली पोलिसांची प्रशंसा केली. ते म्हणाले, "दिल्लीची लोकसंख्या 1.70 कोटी आहे. ज्या भागात हिंसाचार उसळला होता त्या भागाची लोकसंख्या 20 लाख आहे. ईशान्य दिल्लीचं भौगोलिक स्थानही आपण लक्षात घ्यायला हवं. या सगळ्या बाबी दंगली भडकण्यास कारण होत्या. दिल्लीतली दंगल 4 टक्के क्षेत्र आणि 14 टक्के लोकसंख्येपुरती मर्यादित राहिली यासाठी पोलिसाचंं कौतुक. दिल्लीच्या अन्य भागात हिंसाचार पसरू नये ही मोठी जबाबदारी होती. दंगल भडकवण्याचे प्रयत्न होत असतानाही दिल्ली पोलिसांनी हे आव्हान पेललं आणि त्यासाठी त्यांची प्रशंसा करायलाच हवी."
"दिल्ली हिंसाचारासंदर्भातली चर्चा होळीनंतर करण्याचा उद्देश होता. 11 तारखेलाच आपण चर्चा करणार होतो. पण विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहाचं कामकाजच बंद केलं गेलं", अशा शब्दांत शहांनी काँग्रेसवर टीका केली.
अन्य बातम्या
'कोरोना'ची दहशत! व्हायरसमुळे हजारो कोंबड्या जिवंत गाडल्या, पाहा Video
ज्योतिरादित्यांबद्दल अखेर राहुल गांधींनी मौन सोडलं; जवळच्या मित्राबद्दल म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Delhi violence, Lok Sabha (Governmental Body)