बंगळुरू, 11 मार्च : चिकन (Chicken) खाल्ल्याने आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होईल, या भीतीनं लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली. त्यामुळे चिकनचा खप कमी झाला आहे. शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल दराने कोंबडीची विक्री करावी लागते आहे, तरीही ती कुणी घेण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत आता कोरोनाव्हायरसमुळे शेतकऱ्यांनी हजारो कोंबड्या जिवंत गाडल्या आहेत. कर्नाटकच्या (Karnataka) बेळगाव (Belagavi) आणि कोलार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कोंबड्या जिवंत गाडल्यात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
A dejected farmer Nazeer Makandar from Lolasoora village in #Gokak, #Belagavi decided to bury #chicken from his #poultry farm, following steep fall in price due to #CoronavirusOutbreak. @DeccanHerald @CMofKarnataka @mani1972ias #Coronavid19
— Niranjan Kaggere (@nkaggere) March 10, 2020
Nazeer Makandar pic.twitter.com/OExEPM39ay
बेळगावच्या लोसुर (Lolsur) गावातील शेतकरी नाझीर मकंदर यांनी तब्बल 6,500 कोंबड्यांना जिवंत गाडलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, ट्रकभर या कोंबड्या आणल्या आणि खड्ड्यात त्यांना टाकलं गेलं. कोलारमधील (Kolar) मंगोडी (Magondi) गावातही अशीच घटना घडली आहे, तिथल्या एका शेतकऱ्याने 9,500 कोंबड्या जिवंत गाडल्यात, असं वृत्त Deccan Herald ने दिलं आहे. कोरोनाव्हायरसच्या भीतीनं लोकं चिकन खात नाहीत, कोंबड्या घेत नाहीत. त्यामुळे कोंबड्यांचे दर कमी करण्यात आलेत. यातून कुक्कुटपालनाचा खर्चही मिळत नाही आहे, शिवाय कोंबड्यांना खाद्य पुरवून त्यांना जगवणंही अशक्य झालं आहे. त्यामुळे ज्या हातांनी या कोंबड्यांना जगवलं, त्याच हातांनी त्यांना जिवंत गाडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. हे वाचा - ‘कोरोना’मुळे कोंबडी झाली चारण्याची आणि मसाला बाराण्याचा! महाराष्ट्रातही नाशिकच्या मालेगाव येथील तेजस सानप यांनी मागील दहा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्याकडे तीन हजार पाचशे पक्षी असून कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे ग्राहक मिळत नसल्यानं या शेतकऱ्याला 7 लाखांचा माल केवळ 90 हजारांत विकण्याची वेळ आली आहे. 70 ते 80 रुपये प्रति किलो असलेले दर आता 10 रुपये करूनही त्यांच्यावर ग्राहक शोधण्याची वेळ आली आहे.कोंबड्यांना खाद्यही मिळत नसल्याने 500 कोंबड्या जंगलात सोडून दिल्या होत्या. हे वाचा - Fact Check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का? चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ‘चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका’, असं पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं. जर कोणालाही काहीही शंका असतील तर पशुपालन विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. शिवाय महाराष्ट्रातही अशी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्यात आला.