Home /News /national /

EXCLUSIVE: हिजाब वाद, सीएए ते यूपी निवडणुका या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर अमित शहा यांची बेधडक मुलाखत

EXCLUSIVE: हिजाब वाद, सीएए ते यूपी निवडणुका या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर अमित शहा यांची बेधडक मुलाखत

amit shah exclusive interview with news18: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका, ध्रुवीकरणाचे राजकारण, हिजाबचा वाद, सीएएचा मुद्दा, कोरोना, दहशतवाद, सीएए, समान नागरी संहिता, योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत शंका असे अनेक सूचक मुद्दे आहेत, ज्यांची चर्चा या वेळी होत आहे. या सर्व मुद्द्यांवर नेटवर्क 18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी विशेष संवाद साधला. या सर्व मुद्यांवर गृहमंत्री अमित शाहा यांनी आपले परखड मत मांडले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : देशातल्या पाच राज्यांतल्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. ध्रुवीकरणाचं राजकारण, बुरख्यावरून सुरू असलेला वाद, सीएएचा मुद्दा, कोरोना संसर्गाचा मुद्दा, दहशतवाद, उत्तर प्रदेशात (UP Elections) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये या विषयांवर वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी (Rahul Joshi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची Exclusive मुलाखत घेतली. ही मुलाखत News 18 वर रात्री आठ वाजता पाहताही येईल. यूपीमध्ये 300+ चा नारा देण्यामागे उद्देश काय आहे? मी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा करून तुमच्यासमोर बसलो आहे. यूपीमध्ये मोठ्या बहुमतासह भाजपचं सरकार येईल. योगीजी यांच्या नेतृत्वाखाली जनतेचं मन जिंकण्यात भाजप सफल झाली आहे. भाजपसाठी जनता विजयाची बाउंड्री ठोकेल. भाजपला 230 ते 260 जागा मिळतील, असं सर्व्हेमध्ये दिसत आहे. पर्सेप्शन अनेकदा महत्त्वाचं असतं. सर्व्हे करणारे सर्व जण आपली क्रेडिबिलिटी सांगतात. सर्व्हेमध्ये जनता जे सांगते, ते खरंच असेल असं काही सांगता येत नाही. तुम्ही कोणते मोठे मुद्दे घेऊन जनतेला सामोरे गेलात? गेल्या तीन निवडणुकांपासून यूपीची जनता भाजपसोबत आहे. आत्ताच्या वेळी सर्वांत मोठा मुद्दा कायदा-सुव्यवस्थेचा आणि गरीब कल्याणाचा आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणं हा या वेळी आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपने Administration मध्ये मोठा बदल केला आहे. यापूर्वीची सरकारं जातिवादावर आधारित होती. भाजपसाठी सर्वांत मोठा मुद्दा कायदा-सुव्यवस्थेचा आहे? पूर्वी FIR दाखल होत नव्हती. आता ती दाखल होते. समाजवादी पक्षाच्या सरकारमद्ये एका विशेष धर्माला सवलत मिळत होती. मेरठमधून पलायन करणं नागरिकांना भाग पडत होतं. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर गुंडांचा कब्जा होता. योगी सरकारच्या काळात दरोड्यांच्या प्रमाणात 72 टक्के घट झाली आहे. तसंच, लूटमारीच्या घटनांत 62 टक्के, बलात्काराच्या घटनांत 50 टक्के घट झाली आहे. आझम, अतीक अहमद, मुख्तार हे सगळे एकत्र तुरुंगात आहेत. आधी जे त्रास द्यायचे, ते आता तुरुंगाची हवा खात आहेत. पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात माफिया होते. आता एकाही जिल्ह्यात बाहुबली नाही. आम्ही जवळपास 2000 कोटी रुपयांची संपत्ती माफियांच्या तावडीतून सोडवली आहे. Fodder scam case : लालू प्रसाद यादवांना 5 वर्षांचा तुरुंगवास; 60 लाखांचा दंड पंतप्रधानांनी सांगितलं, की सपा-बसपाच्या राज्यात दहशतवाद्यांना सोडून दिलं जात होतं SP-BSP चं सरकार होतं, तेव्हा 11 प्रकरणांमध्ये UAPA मागे घेण्यात आला होता. त्याचं उत्तर निवडणुकीत या पक्षांना द्यावं लागेल. पोटा आणि UAPA हटवून त्यांनी कोणाला मदत केली? फक्त व्होटबँकेसाठी असं केलं? काँग्रेसच्या कार्यकाळातही अशी अनेक प्रकरणं घडली होती. दहशतवादाच्या बाबतीत जातिवादी पक्षांचं धोरण, भूमिका अगदीच कमजोर राहिली आहे. योगीजींनी 80-20 चा उल्लेख केला. ही हिंदू-मुस्लिमांची विभागणी आहे का? हिंदू-मुस्लिमांची विभागणी आहे असं मी मानत नाही. पोलरायझेशन जरूर होत आहे; मात्र गरीब नागरिक, शेतकरीही पोलराइज होत आहेत. किसान कल्याण निधीचे पैसे मिळू लागले आहेत. हिंदू-मुसलमान पोलरायझेशन पाहत नाही आहात का? आम्ही व्होटबँकेच्या हिशेबाने तिकडे पाहत नाही. ज्यांचा अधिकार आहे, त्यांच्यासोबत सरकार आहे अशा विचाराने आम्ही चालतो. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ नागरिकांना मिळत आहे. आधी 2 कोटी 62 लाख घरांमध्ये शौचालयं नव्हती. आम्ही यूपीमध्ये 1 कोटी 41 लाख घरांपर्यंत वीज पोहोचवली आहे. त्याशिवाय 2 कोटी 68 लाख LED Bulb वाटले गेले. 15 कोटी गरिबांना गेली दोन वर्षं मोफत रेशन देण्यात आलं. 42 लाख नागरिकांना घर देण्याचं काम झालं. आता 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचं उद्दिष्ट आहे. भाजप मुस्लीमांना तिकीट का देत नाही? मुस्लिमांशी आमचं तेच नातं आहे, जे सरकारचं असलं पाहिजे. शेवटी निवडणुकीत मत कोण देतं तेही पाहायला लागतं ना! मुस्लिमांना तिकीट न देणं हा राजकीय निरुपाय आहे का? हा राजनैतिक शिष्टाचार आहे. सरकार संविधानाच्या आधारावर चालतं. सरकार देशाची जनता निवडून देते. राहुल गांधींनी चिनी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी प्रोटोकॉल तोडला - अमित शाहा पलायनाचा मुद्दा आज आहे का? पलायनाचा मुद्दा आजही आहे. कोरोनात जे आले आहेत, ते शांततेने जगत आहेत. आता त्यांना पलायन करावं लागत नाहीये. यूपीमध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं होतं. तसंच Administration मध्ये राजकारण आलं होतं. भाजप सरकारमध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं नाहीये. यूपीच्या जनतेला परिवारवादी, जातिवादी राजकारणापासून मुक्तता मिळाली आहे. योगी सरकारने यूपीची अर्थव्यवस्था आठव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आणली आहे. यूपीमध्ये बेरोजगारीचा दर 17.3 टक्के होता. आज तो 4.1 टक्के आहे. 1 कोटी 61 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अखिलेश यादव म्हणतात, भाजप मुद्द्यांपासून भरकटत आहे अखिलेश यादव यांनी आकड्यांच्या साह्याने आपला मुद्दा मांडला तर बरं होईल. आम्ही मुद्द्यांपासून भरकटतोय की ते भरकटताहेत? कोविडच्या कालावधीत जगभरात महागाई वाढत आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसला. मोदी सरकारने महागाई नियंत्रित करण्याचं काम केलं आहे. बुरख्याच्या मुद्द्यावर तुमचं मत काय आहे? शाळेचा ड्रेस कोड अर्थात गणवेश सर्व धर्मीयांनी मानला पाहिजे. सध्या ते प्रकरण कोर्टात आहे. कोर्ट जो काही निकाल देईल, तो मानला पाहिजे. माझं वैयक्तिक मत असं आहे, की शाळेबाबत हे मुद्दे धर्मापासून वेगळे ठेवले पाहिजेत. यात काही कट असेल, तर विरोधकांचे इरादे सफल होणार नाहीत. जयंत चौधरींना सोबत घेण्याचा प्रयत्न केलात, आता कसला विचार करत आहात? भाजप पूर्ण बहुमताने जिंकणार आहे. मी असं म्हटलं होतं, की जयंत चुकीच्या ठिकाणी गेले आहेत. जयंत चौधरींसाठी भाजपचे रस्ते खुले आहेत? भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल. जयंत यांच्याशी निवडणुकीनंतर अलायन्सची गरज भासणार नाही. आमच्या पक्षाचा दोन पक्षांशी अलायन्स आहे. भाजपला कोणाची गरज पडणार नाही. मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या योजनांनी चित्र बदललं आहे. यूपीची निवडणूक पूर्णपणे भाजपच्या बाजूने आहे. 70 वर्षं गरीब कल्याण होत नव्हतं. त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांमध्ये गरीब कल्याणासाठी चांगलं काम झालं आहे. ही निवडणूक जाती आणि धर्माच्या पलीकडे असेल? या सगळ्याची सुरुवात काँग्रेसने केली. SP-BSP ने त्या विषयात अधिक रंग भरले. यूपीमध्ये 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला 65 जागांवर विजय मिळाला. राजकारणात 1+1=2 असं होत नाही. अनेकदा 1+1=11 असं होत जातं. राज्य आणि केंद्राची निवडणूक वेगळी असते? 2014, 17, 19 या वर्षांत यूपीची जनता एकाच रस्त्यावर चालली आहे. यूपीची जनता भाजपसोबत आली आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की 2022मध्येही जनता भाजपचं सरकार स्वीकारील. मायावतींकडे आपण कसं पाहता? त्या राजकीयदृष्ट्या फारशा सक्रिय नाहीत मायावतींची ग्राउंड्सवर पकड आहे. त्याचं सीट्समध्ये किती रूपांतर होईल, हे सांगता येत नाही. Exclusive : शाळेचा गणवेश सर्वधर्मीयांनी मान्य करायला हवा : अमित शाहा मायावतींची जाटव व्होटबँक? जाटव व्होटबँक मायावतींसोबत जाईल. मुस्लिम मतंही मोठ्या संख्येने मायावतींकडेच जातील. मायावती आणि भाजप यांची आघाडी होईल? भाजपला सरकार बनवण्यासाठी आघाडीची गरजच नाही. भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करील. चांगलं काम करण्यासाठी सगळ्यांचाच पाठिंबा हवा. समाजवादी पक्षाचाही हवा, विरोधी पक्षांचाही हवा. सर्वांत गरीब नागरिक भाजपशी जोडलेले आहेत. मध्यमवर्ग सुखशांतीने भाजपशी जोडला गेलेला आहे. 86 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होत आहेत. दोन कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळालं आहे. शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये राग नाही? शेतकऱ्यांमध्ये पर्सेप्शन तयार करण्याचा खूप प्रयत्न झाला; मात्र शेतकरी भाजपसोबत आहेत. ब्राह्मण व्होटबँकेला अखिलेश यादव सोबत आणू इच्छितात, याकडे कसं पाहता? हे मुद्द्यापासून भरकटणं आहे, असं मला वाटतं. कारण जातिवादाबद्दल बोलण्याला दुसरं काय म्हणायचं? आम्ही गरीब, शहरी मतदारांबद्दल बोलतो. भाजप जातींबद्दल बोलला नाही. निवडणुकीत ओवैसी फॅक्टरकडे कसं पाहता? ओवैसी देशभर दौरे करतात, विशेषतः मुस्लिमांना संबोधित करतात. AIMIM ला मतंही मिळतात प्रत्येक वेळी; मात्र एखाद्या घटनेला कायदा-सुव्यवस्थेशी जोडू नये. जेव्हा कारवाई केली जात नाही, तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. दोन तासांमध्ये दोन आरोपींना पकडण्यात आलं. आम्ही ओवैसींना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा प्रत्येक व्यक्तीला मिळाली पाहिजे. मुस्लिमांमध्ये ओवैसींचं आकर्षण तर आहेच. काँग्रेस आणि प्रियांका गांधी यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. काँग्रेसच्या भविष्याचं चित्र बंगालमध्ये दिसलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलं, की कोणा भैय्याला इथे सरकार बनवण्यासाठी येऊ देणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्यं करायची, ही काँग्रेसची सवय आहे. चांगल्या समाजासाठी हे चांगलं नाही. ज्याला जिथे जायचं आहे, तिथे त्याला जायला मिळायला हवं. प्रियांका तिथे उपस्थित होत्या. त्या तिथे खूश होत होत्या आणि यूपीमध्ये सन्मानाच्या बाता मारत होत्या. राहुल गांधींचा आरोप आहे, की भाजप सरकारच्या धोरणांमुळे चीन-पाकिस्तान एकत्र आले राहुल गांधीजींना देशाचा इतिहास माहिती नाही. 1962 मध्ये काय झालं होतं आणि काँग्रेसची चूक काय आहे, हे त्यांना माहिती नाही. चीनने जितकी आव्हानं उभी केली, त्या प्रत्येकाला भारताने पूर्ण सामर्थ्याने उत्तर दिलं. गलवान घाटी असो किंवा पूर्वेकडचा संघर्ष असो. प्रत्येक ठिकाणी भारताने आपली भूमिका ठोस ठेवली आहे. भारताने सीमा राखली आहे आणि सार्वभौमत्व जपलं आहे. अशा चीनसोबत राहुलजींनी काय गुफ्तगू केलं? त्यांनी प्रोटोकॉल मोडला. यूपीमध्ये योगी आदित्यनाथच मुख्यमंत्री बनतील? योगी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे कितीही सीट्स आल्या, तरी तेच मुख्यमंत्री बनणार. 51 नवी कॉलेजेस उभारली, 40 मेडिकल कॉलेजेस उभी राहिली. केन-बेतवा लिंक या मुद्द्यावर काम करण्याचा संकल्प केला आहे. यूपीमध्ये विकासाचं नवं मॉडेल तयार करून दिलं आहे. यूपीमध्ये 5 एक्स्प्रेस वेज बनवण्याचं काम होत आहे. यूपीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसह विकास होत आहे. पंजाबमध्ये आघाडीतल्या मित्रांची काय स्थिती असेल? पंजाबमधली स्थिती केवळ ज्योतिषीच सांगू शकतो. पंजाबमध्ये भाजप आघाडीने चांगली लढाई लढली आहे. पंजाबात सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मोदीजींना भाषणापासून रोखणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपला यश मिळेल; मात्र किती मिळेल हे सांगता येत नाही. चन्नीजींनी तुम्हाला एक पत्र पाठवलं होतं. त्याचं तुम्ही उत्तर दिलंत? कोणत्याही पक्षाचा फुटीरतावाद्यांशी संबंध असणं चांगलं नाही. कोणतंच सरकार अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आमचं सरकार याची नक्की चौकशी करील. तपास करील. मुख्यमंत्री पत्र लिहितात, तेव्हा तो विषय दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. उत्तराखंडमध्ये कोणाचं सरकार येईल? निश्चितच उत्तराखंडमध्येही भाजपचंच सरकार येईल. धामीजींनी खूप थोड्या काळात चांगलं काम केलं आहे. उत्तराखंडमध्ये विकासाच्या मुद्द्यावर काम झालं आहे. गरीब कल्याण हाही उत्तराखंडमध्ये मोठा मुद्दा आहे. तीन मुख्यमंत्री बदलले. काही नेते सोडून गेले. त्यामुळे काही नुकसान? त्यामुळे नुकसान तर होतंच; पण भाजपने चांगलं काम केलं आहे. त्यामुळे बहुमत मिळेल. मणिपूरमध्येही भाजप चांगली टक्कर देत आहे. दहशतवादी घटना नियंत्रणात आणण्याचं काम केलं आहे. मणिपूरमध्ये विकासाचं काम झालं आहे. पहिल्यांदाच पर्वतीय प्रदेशांतले नागरिक कौतुक करत आहेत. CAA केव्हापर्यंत लागू होईल? कोरोनानंतरच त्याबद्दल विचार केला जाऊ शकेल. कोरोनानंतर तातडीने CAA वर निर्णय घेतला जाईल. त्यात मागे येण्याचा काही प्रश्नच नाही. समान नागरी कायदा अर्थात Uniform Civil Code वर तुमचा काय विचार आहे? उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सिव्हिल कोड समाविष्ट केला आहे. उत्तराखंडमध्ये सरकार बनवल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ. व्यापक चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल. इम्रान खान यांनी सांगितलं, की भारत-पाकिस्तानने बसून वाद सोडवले पाहिजेत काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. यावर काय चर्चा करणार?
    First published:

    Tags: Amit Shah, Election, Pm modi

    पुढील बातम्या