जाहिरात
मराठी बातम्या / देश / Exclusive : शाळेचा गणवेश सर्वधर्मीयांनी मान्य करायला हवा : अमित शाहा

Exclusive : शाळेचा गणवेश सर्वधर्मीयांनी मान्य करायला हवा : अमित शाहा

Exclusive : शाळेचा गणवेश सर्वधर्मीयांनी मान्य करायला हवा : अमित शाहा

UP Elections 2022 च्या पार्श्वभूमीवर Network18 च्या राहुल जोशी यांनी गृहमंत्री अमित शाहा यांची मुलाखत घेतली. त्यावर सध्या देशभर गाजत असलेल्या हिजाब वादावरही (Karnataka Hijab Row) शाहांनी टिप्पणी केली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी: देशातल्या पाच राज्यांतल्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. ध्रुवीकरणाचं राजकारण, बुरख्यावरून सुरू असलेला वाद, सीएएचा मुद्दा, कोरोना संसर्गाचा मुद्दा, दहशतवाद, उत्तर प्रदेशात (UP Elections 2022) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये या विषयांवर वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी (Rahul Joshi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची Exclusive मुलाखत (Amit Shah Exclusive Interview) घेतली. या इंटरव्ह्यूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सध्या सुरू असलेल्या बुरख्याच्या वादावर (Hijaab) पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं.

    ‘शाळेचा ड्रेस कोड सर्व धर्मांच्या व्यक्तींनी मान्य केला पाहिजे,’ असं मत शहा यांनी मांडलं. ‘सध्या या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कोर्ट जो काही निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य केला पाहिजे,’ असं अमित शहा (Amit Shaha) म्हणाले. ‘या बाबतीत विरोधकांची इच्छा पूर्ण होणार नाही. त्यांचे सर्व प्रयत्न विफल होतील,’ असं मतही शहा यांनी व्यक्त केलं. कर्नाटकातल्या (Karanataka School) शाळेत सुरू झालेल्या या वादाचं लोण हळूहळू सर्वत्र पसरलं. त्यामुळे त्यातून ध्रुवीकरणाच्या मुद्द्याची चर्चा होऊ लागली. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांचं हे पहिलंच मतप्रदर्शन आहे.

    राहुल जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाला अमित शहा यांनी सविस्तर उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘शाळेचा जो गणवेश असेल, म्हणजेच जो काही ड्रेसकोड (School Dress Code) असेल, तो सर्वांनी मानला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे; मात्र सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्टाचा जो काही निर्णय असेल, तो सर्वांनी स्वीकारायला हवा. देश संविधानाच्या आधारेच चालायला हवा. जोपर्यंत कोर्टाचा काही निर्णय येत नाही, तोपर्यंतच माझ्या वैयक्तिक मताला अर्थ राहतो. कोर्टाने एकदा यावर निर्णय दिला, की तो जो काही निर्णय असेल तो मलाही मान्य करावाच लागेल, स्वीकारावाच लागेल.’ आपल्या वैयक्तिक मताचा पुनरुच्चार करताना अमित शहा म्हणाले, ‘कोर्टाचा निर्णय काहीही असो; पण मला वैयक्तिक असं वाटतं, की शाळेत जो काही ड्रेस कोड असेल, तो सर्व मुलांनी पाळला पाहिजे. ही बाब सर्व धर्मांच्या (Religion) वर राखली पाहिजे.’ या प्रकरणामागे काही कट आहे का, असा प्रश्न विचारला असता अमित शहा म्हणाले, ‘हा अनेक व्यक्तींचा कट आहे; मात्र कोर्टाचा निकाल आल्यानंतर जनता ते स्वीकारील.’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात