मराठी बातम्या /बातम्या /देश /5 मिनिटात 2 कोटीच्या जमिनीची किंमत 18.5 कोटी झाली, राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा गंभीर आरोप

5 मिनिटात 2 कोटीच्या जमिनीची किंमत 18.5 कोटी झाली, राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा गंभीर आरोप

आपने अयोध्येत राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.

आपने अयोध्येत राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.

आपने अयोध्येत राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली 14 जून : आम आदमी पार्टीचे (AAP) राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं (Ayodhya Ram Mandir) निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. रविवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत सिंह यांनी आरोप केला, की ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने 2 कोटी किंमत असणारी जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी केली. हे सरळ भ्रष्टाचाराचं प्रकरण असून सरकारने याची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय समाजवादी पार्टी सरकारमधील मंत्री आणि अयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही भ्रष्टाचाराचे असेच आरोप केले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.

चंपत राय यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, की अशा प्रकारच्या आरोपांना ते घाबरत नाहीत. ते स्वत: वर झालेल्या आरोपांचा अभ्यास करतील. माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त निवेदनात राय म्हणाले, "आमच्यावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. आम्हाला आरोपांची भीती वाटत नाही. मी या आरोपांचा अभ्यास करुन चौकशी करीन.

याआधी परिषदेत काही कागदपत्रे सादर करत सिंह म्हणाले, 'भगवान श्री राम यांच्या नावाने कोणताही घोटाळा आणि भ्रष्टाचार करण्याची कोणी हिंमत करेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण मी तुम्हाला जी कागदपत्रे दाखवणार आहे ती सरळ सरळ हेच सांगतील, की रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय जी यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मुंबईतील 'त्या' कारची आत्महत्या?

त्यांनी असा आरोप केला आहे, की 2 कोटी रुपयात विकत घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखानं वाढत गेला. भारतच काय तर जगातील कुठल्याच जमिनीचा भाव इतक्या वेगानं वाढत नाही. हे उघडपणे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारकडे अशी मागणी करतो, की याप्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी. तसंच या गंभीर भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते म्हणाले, की हा प्रश्न देशातील करोडो राम भक्तांसह राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टानं कमावलेले पैसे मंदिरासाठी देणाऱ्यांच्या विश्वासाचाही आहे.

'जनतेच्या प्रश्नांसाठी यशोमती ठाकूर CMच्याही अंगावर जायलाही मागे पुढे पाहत नाही'

आप प्रवक्ता म्हणाले, की कोणत्याही ट्रस्टमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी योग्य बोर्डाचा ठराव असतो. केवळ पाच मिनिटांमध्ये हा प्रस्ताव राम मंदिर ट्रस्टने पारित कसा केला आणि तात्काळ जमीनही खरेदी केली? ते म्हणाले, 'मला वाटते की श्री राम यांच्या भव्य मंदिराच्या नावाखाली देणगी देणाऱ्या कोट्यवधी भाविकांना खरोखर दु: ख झाले असेल. भगवान श्री राम यांच्या नावावर स्थापन झालेल्या ट्रस्टमधील ते जबाबदार लोक कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Ayodhya ram mandir, Ram mandir donation