Home /News /maharashtra /

'जनतेच्या प्रश्नांसाठी यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जायलाही मागे पुढे पाहत नाही': नाना पटोले

'जनतेच्या प्रश्नांसाठी यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जायलाही मागे पुढे पाहत नाही': नाना पटोले

Nana Patole on Yashomati Thakur: काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यशोमती ठाकूर यांच्या कार्याचं कौतुक करत त्या किती आक्रमक आहेत हे सांगितलं आहे.

अमरावती, 13 जून: काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत नाना पटोले यांनी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना रणरागिणी संबोधत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. यशोमती ठाकूर आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी कशा प्रकारे लढत असतात याचं उदाहरणही नाना पटोले यांनी दिलं आहे. नाना पटोले यांनी म्हटलं, "तुम्हीच यशोमतीताईंला वाघीण, रणरागिणी म्हटलं आहे. मी गेली अनेक वर्षे विधानसभेत यशोमती ताईंना पाहत आलो आहे. मतदारसंघतील लोकांच्या, तुमच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी या रणरागिणी भांडत असतात. वेळ आली तर तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला ही त्या मागेपुढे पाहत नाही." नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्याचा काल समारोप झाला तेव्हा ते अमरावतीच्या मोझरी येथे बोलत होते. 2024 ला काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर सरकार चालवू असे देखील नाना पटोले यांनी सांगितले. नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय! राजकारणात वादळ येणार की केवळ चर्चांना उधाण पुढे नाना पटोले यांनी म्हटलं, "आपला उमेदवार यापूर्वीपेक्षा अधिक मतांनी निवडून आला पाहिजे. मला पॅटर्न लागू करायचा आहे. तिवसा विधानसभा क्षेत्राच पॅटर्न सर्वत्र लागू करायचा आहे आणि आता त्यासाठी तुमची जबाबदारी आहे."
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Nana Patole, Uddhav thackeray, Yashomati thakur

पुढील बातम्या