Lockdown 4.0 : 31 मेनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार? असा असेल सरकारचा नवा प्लॅन

Lockdown 4.0 : 31 मेनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढणार? असा असेल सरकारचा नवा प्लॅन

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : कोरोनाव्हायरसमुळं (Coronavirus) फक्त भारतच नाही तर जगभरातील 200 हून अधिक देश संकटात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. देशात रोज 7 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं आता सरकार 31 मेनंतर काय करणार, याकडे सर्वांचे लश्र लागले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 1 लाख 51 हजार 767 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 6387 नवीन रुग्ण सापडले आहे तर 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. अशा परिस्थिती लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे.

वाचा-मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री

असा असू शकतो प्लॅन

इकोनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार दर 14 दिवसांनी लॉकडाऊनचा आढावा घेतला जाईल. यापुढे केंद्राची भूमिका लॉकडाऊनमधील नियम, कर्जमाफी आणि निर्बंधाबाबत कमी असेल, जास्त अधिकार हे राज्यांना देण्यात येतील. गृह मंत्रालय पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवरील नियमावली जाहीर करेल. यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्यच राहणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागणार आहे.

वाचा-धक्कादायक परिणाम! कोरोनाची पहिली लस दिलेला तरुण आधी झाला बेशुद्ध मग...

अशी होती नियमावली

लॉकडाऊन 4.0बाबत गृह मंत्रालयानं 17 मे रोजी नियमावली जाहीर केली होती. यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर सर्व झोनना सूट दिली होती. तसेच, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे, शाळा-महाविद्यालये, कोचिंग संस्था, पब-बार, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे, जिम, थिएटर, क्लब, मॉल्स इत्यादी अजूनही बंद आहेत. लॉकडाऊन 4 दरम्यान सरकारने 21 मेपासून गाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणेही सुरू झाली आहेत. लवकरच मेट्रो सेवा सुरू केल्याची चर्चा आहे.

वाचा-शाळा कॉलेज कधी सुरू होणार? केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवं स्पष्टीकरण

First published: May 27, 2020, 2:56 PM IST

ताज्या बातम्या