वॉशिंग्टन, 27 मे : कोरोना लसीची ट्रायल अनेक देशांमध्ये सुरू आहे. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीनेही एक लस तयार केली असून त्याची चाचणी सुरू आहे. आता या लसीचा प्रयोग केलेल्या एक तरुणावर याचा कसा परिणाम झाा हे समोर आलं आहे. वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय इआन हेडनला कोरोनाची लस देण्यात आली होती. 'स्टेट न्यूज' या आरोग्य बातमी वेबसाईटशी बोलताना इआनने त्यांच्या शरीरावर काय परिणाम झाले, हे सांगितले.
दरम्यान, इआननं या लसीचा त्याच्यावर वाईट परिणाम होत असूनही, ही लस लोकांना द्यावी अशी त्याची इच्छा आहे. इआननं सांगितलं की लसचा दुसरा डोस घेतल्यानंतर 12 तासांनी त्याला 103 ताप होता. इआनची प्रकृती चिंताजनक झाल्यावर इमर्जन्सी क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले पण घरी परत आल्यावर तो बेशुद्ध पडला. मात्र, 24 तासांच्या आत त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
इआननं सांगितलं की, लसीचा परिणाम होत असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. मॉडर्नाच्या लसीबाबत किंवा इतर कोणत्याही लसीबाबत विरोध दर्शवणार नाहीत. कारण ही लस सध्या महत्त्वाची आहे. दरम्यान नुकतेच Reuters/Ipsosकडून नुकतेच अमेरिकेत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुमारे एक चतुर्थांश अमेरिकन तरुण कोरोना लस घेण्यात रस नाही. त्यांच्यापैकी बर्याच जणांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
वाचा-आनंदाची बातमी! US च्या या कंपनीने सुरू केलं कोरोनाच्या लसीचं माणसांवर ट्रायल
मॉडर्ना कंपनीने इआनसह इतर 45 स्वयंसेवकांवर कोरोना लसीचा ट्रायल केलं. डेली मेलच्या अहवालानुसार आतापर्यंत चार स्वयंसेवकांना गंभीर समस्या आल्या आहेत मात्र कोणाच्याही जीवाला धोका नाही.
लसीचा परिणाम
Reuters/Ipsosने अमेरिकेत 4428 प्रौढांचे सर्वेक्षण केले. 14 टक्के लोक म्हणाले की त्यांना ही लस वापरण्यात रस नाही, तर 10 टक्के म्हणाले की त्यांना फारसा रस नाही, तर 11 टक्के लोकांनी लस घेण्याचा निर्णय घेऊ शकले नाही. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनापासून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किमान 70 टक्के लोकांना लसीकरण करण्याची आवश्यकता असेल. त्याच वेळी इआन हेडनने सांगितले की, जेव्हा त्यांना मॉडर्ना लसचा पहिला डोस देण्यात आला तेव्हा त्याच्या हात दुखू लागला. तर, दुसर्या डोसनंतर इआन हेडनची तब्येत बिघडली. त्यामुळं त्याला तातडीनं पहाटे 5 वाजता जावे लागले. काही उपचारानंतर तो घरी परतला मात्र लगेचच बेशुद्ध पडला.
वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅनआणखी एका लसीची चाचणी सुरू
अमेरिकेच्या (US) एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियामधील (Australia) मानवांवर कोरोनाव्हायरस (Coronavirus) औषधाची चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस औषध तयार होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. 'नोव्हावाक्स' (Novavax) या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे आघाडीचे संशोधक डॉ. ग्रिगोरी ग्लेन यांच्या म्हणण्यानुसार मेलबर्न आणि ब्रिस्बेन शहरातील 131 जणांवर त्याची चाचणी सुरू झाली आहे.
लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरंवाचा-कोरोनापेक्षा अज्ञात व्हायरसचा जगाला जास्त धोका, शास्त्रज्ञांनी दिला इशारा
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.