नवी दिल्ली, 27 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पाही 4 दिवसांत संपणार असून आता शाळा कॉलेज कधी सुरू होणार असे सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपासून 15 जूनपर्यंत शाळा महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती. शाळा- महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आला नाही असं मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तसे कोणतेही निर्देश राज्यांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
No such decision taken by Ministry of Home Affairs. All Educational institutions are still prohibited to open, throughout the country: Press Information Bureau (PIB) on media reports that Ministry of Home Affairs has permitted all States to open schools
— ANI (@ANI) May 26, 2020
हे वाचा- इंडिगो-एअर इंडिया विमानातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह, शेकडो प्रवासी क्वारंटाइन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक शाळांचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा केली होती. यानंतर प्रथम लॉकडाऊन 3 मे पर्यंत आणि नंतर 17 मे पर्यंत वाढविण्यात आला. नंतर त्याचा कालावधी 31 मे पर्यंत वाढविण्यात आला. चीनमधील वुहान शहरातून उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतात 1.25 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. हे वाचा- कल्याण-डोंबिवली महापालिका बिल्डिंगमध्ये घुसला कोरोना, बड्या अधिकाऱ्याला संसर्ग संपादन- क्रांती कानेटकर