मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? याबाबत काय म्हणाले गृहमंत्री

मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? याबाबत काय म्हणाले गृहमंत्री

मुंबईसह पुणे शहरात येत्या शनिवारपासून पुढील 10 दिवस कडकडीत बंद राहणार आहेत. दोन्ही शहरे पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात राहातील

  • Share this:

मुंबई, 27 मे: दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईसह पुणे शहरात येत्या शनिवारपासून पुढील 10 दिवस कडकडीत बंद राहणार आहेत. दोन्ही शहरे पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात राहातील, अशा एका पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ केला आहे. महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, या पोस्टबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

हेही वाचा...राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, जारी केली अध‍िसूचना; या लोकांना मिळणार दिलासा

ही पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. अफवा पसरवण्याच्या हेतूने करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

अनिल देशमुख यांनी सांगितलं की, जाणीवपूर्वक व्हॉट्सअॅप व अन्य समाज माध्यमांतून अफवा पसरवली जात आहे. मुंबई व पुण्यात लष्कर तैनात होणार आहे. लष्काराकडून लष्काराकडून 10 दिवसांसाठी संचार बंदी लागू करेल. हे पूर्णपणे खोटं आहे. @MahaCyber1 ने ही अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन 4.0 च्या काळात निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे. तरी देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि नागपूर आदी शहरात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे.

हेही वाचा... काँग्रेस लाचार, जनाची नाही.. मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, विखे पाटलांची टीका

धक्कादायक म्हणजे मुंबई आणि पुणे येथे रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण रोखण्यासाठी शनिवारपासून 10 दिवस संपूर्णपणे मुंबई आणि पुणे शहरे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियात फिरत आहे. ही पोस्ट खोडसाळ आणि चुकीची तसेच अफवा पसरवणारी आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.

First published: May 27, 2020, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading