लखनऊ, 17 जुलै : पोलिसांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना हादरवणाऱ्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरणाचा भडका काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. आता तर ज्योती मौर्य यांचे कथित प्रियकर जिल्हा होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्या निलंबनाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तशी मागणीच उत्तर प्रदेश होमगार्ड्सचे महासंचालक (डीजी) बीके मौर्या यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता मनीष दुबे यांच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ आयुष्य जगात यावं यासाठी सरकारकडून काही विशेष सुख-सुविधा दिल्या जातात. त्यापैकी काही सुविधा पदाबरोबर येतात आणि पदाबरोबरच जातात. तर काही सुविधा अधिकाऱ्यांचं पद गेलं तरी काढून घेतल्या जात नाहीत. आज आपण मनीष दुबे यांचं निलंबन झाल्यास त्यांना कोणत्या सरकारी सुख-सुविधा उपभोगता येतील, पाहूया.
घर आणि गाडी?
मनीष दुबे यांना सरकारने दिलेलं आलिशान घर सोडावं लागणार नाही. शिवाय घराच्या सुरक्षारक्षकांपासून आचाऱ्यांपर्यंत सर्वांचं काम आहे तसंच सुरू राहील. सरकारने दिलेली गाडीही मनीष दुबे यांच्याकडेच राहील. त्यांना कोणत्याही कामासाठी किंवा चौकशीसाठी कार्यालयात बोलावल्यास ते या गाडीचा वापर करू शकतील. त्याचबरोबर या प्रकरणासंदभार्त असलेल्या कोणत्याही न्यायालयीन कामासाठी त्यांना सरकारकडून प्रवासी भाडं देण्यात येईल. SDM की जिल्हा कमांडंट होमगार्ड, कोण आहे भारी? जास्त POWER कोणाकडे?
आरोग्य सुविधा?
मनीष दुबे आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत तपासण्या आणि उपचारांची सुविधा मिळेल. त्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढता येतील आणि पगारही सुरूच राहील.
पगार?
निलंबनानंतर मनीष दुबे यांना सुरुवातीचे 3 महिने 50 टक्के पगार मिळेल. प्रकरणाची चौकशी 3 महिन्यात पूर्ण झाली नाही, तर त्यांना पगारातील 75 टक्के रक्कम मिळेल आणि 6 महिन्यात चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, तर त्यांना पूर्ण पगार मिळेल.