मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशातल्या काही राज्यांमध्ये 1 जुलैपासून शाळा सुरु, तर काही राज्यांमध्ये अद्याप निर्णय नाही

देशातल्या काही राज्यांमध्ये 1 जुलैपासून शाळा सुरु, तर काही राज्यांमध्ये अद्याप निर्णय नाही

School Reopen List in State: काही राज्यातील शाळा- कॉलेज सुरु होत आहेत. तर काही राज्यांमध्ये या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शाळा- कॉलेज सुरु झालेत आहे.  जाणून घेऊयात कोणत्या राज्यात शाळा- कॉलेजची काय परिस्थिती आहे.

School Reopen List in State: काही राज्यातील शाळा- कॉलेज सुरु होत आहेत. तर काही राज्यांमध्ये या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शाळा- कॉलेज सुरु झालेत आहे. जाणून घेऊयात कोणत्या राज्यात शाळा- कॉलेजची काय परिस्थिती आहे.

School Reopen List in State: काही राज्यातील शाळा- कॉलेज सुरु होत आहेत. तर काही राज्यांमध्ये या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शाळा- कॉलेज सुरु झालेत आहे. जाणून घेऊयात कोणत्या राज्यात शाळा- कॉलेजची काय परिस्थिती आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 08 जुलै: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. देशातला कोरोनाचा प्रार्दुभाव हळूहळू कमी होत असल्यानं देशातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे देशातल्या राज्यांमध्येही शाळा (School Reopen) सुरु करण्यावर भर दिला जात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील शाळा- कॉलेज बंद आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी होत असल्यानं काही राज्यातील शाळा- कॉलेज सुरु होत आहेत. तर काही राज्यांमध्ये या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शाळा- कॉलेज सुरु झालेत आहे.

जाणून घेऊयात कोणत्या राज्यात शाळा- कॉलेजची काय परिस्थिती आहे.

महाराष्ट्र

कोरोनामुक्त गावात 8वी ते 12वीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नवीन जीआर जारी करण्यात आला आहे. यामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्या समितीच्या निर्णयानुसार शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जे गाव महिनाभरापूर्वी कोरोना मुक्त झाले अशा गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू केले जाणारेत. तलाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी ग्रामसेवक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची समिती याबाबत निर्णय घेईल.

शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले असावे, जर ते केले नसेल तर पहिल्यांदा लसीकरण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी काढण्यासाठी शाळा परिसरात येऊन देऊ नये. विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करावी आणि शाळा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.

उत्तर प्रदेश

1 जुलैपासून प्रशासकीय कामकाजासाठी उत्तर प्रदेशमध्ये शाळा उघडण्यात आल्यात. मात्र विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश देण्यात आलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये अजूनही ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. कोरोनाची परिस्थिती बघून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणार असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

बिहार

विद्यापीठे, महाविद्यालय, विविध शिक्षण संस्था, सरकारी प्रशिक्षण संस्था आणि 11वी, 12वीपर्यंतचं शिक्षण 50 टक्केच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार असल्याचं ट्वीट मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं होतं.

हेही वाचा- भररस्त्यात व्यावसायिकावर गोळ्यांचा वर्षाव, गोळीबाराचा LIVE VIDEO

तेलंगणा

तेलंगणा राज्यातील काही शाळा या महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 जुलैपासून सुरु झाल्यात आहेत.

गुजरात

राज्य सरकार शाळा सुरु करण्यासंदर्भात उच्च स्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीत शाळा सुरु करायच्या की नाही यावर निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर शाळा सुरु केल्या जातील, असं शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमध्ये 1 जुलैपासून शाळा सुरु होणार होत्या. मात्र त्याआधीच म्हणजेच 28 जूनला हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे पुढचे आणखीन काही दिवस राज्यात ऑनलाईन शाळा सुरु असणार आहे. केंद्रा सरकारसोबत चर्चा केल्यानंतर शाळाबाबत निर्णय घेणार असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- धक्कादायक! पुण्यात महिलांचं रक्षण करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण

उत्तराखंड

राज्यात उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरु असून शाळा कधी सुरु होणार यावर अद्याप राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाही. उत्तराखंडमध्ये 1 जुलैपासून ऑनलाईन शाळा सुरु झाल्यात.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, India, Lockdown, Maharashtra, School