मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

लग्नास नकार दिल्यानं पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, Video व्हायरल करण्याची धमकी

लग्नास नकार दिल्यानं पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, Video व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime:  महिला पोलीस अधिकाऱ्यालाच (Female police officer) मारहाण (Beating) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 08 जुलै: महिला पोलीस अधिकाऱ्यालाच (Female police officer) मारहाण (Beating) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना पुण्यात (Pune) घडली आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली आहे. (Crime Against Woman)

पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (Sub Inspector ) पदी कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबतच ही घटना घडली आहे. पीडित एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मित्रानेच मारहाण केली आहे. माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकीही या मित्रानेच महिला अधिकाऱ्याला दिली आहे.

30 वर्षीय सिद्धांत भगवानराव जावळे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी मुळचा बीड जिल्ह्यातला माजलगावचा आहे. आरोपी सिद्धांत आणि पीडित महिला पोलीस अधिकारी हे दोघे मित्र होते. त्या दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नंतर काही दिवस गेल्यानंतर आरोपीनं महिलेवर सतत संशय घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी सिद्धांत तिला शिवीगाळ करु लागला तिला मारहाण करु लागला. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं लग्न करण्यास नकार दिला.

हेही वाचा- भररस्त्यात व्यावसायिकावर गोळ्यांचा वर्षाव, गोळीबाराचा LIVE VIDEO

एवढंच नाही तर आरोपीनं पीडितेच्या नातेवाईकांनाही फोन करुन धमकी दिली. महिलेनं लग्न करण्यास नकार दिल्यानंतर माझं तिच्याशी लग्न लावून द्या. अन्यथा मी आत्महत्या करेन. अॅट्रॉसिटीचा तक्रार दाखल करेन. फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सअपवर फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकीही आरोपींनी महिलेच्या नातेवाईकांना दिली होती. आरोपीनं पीडित महिलेकडे पैशांची मागणीही केली होती.

First published:

Tags: Pune, Pune crime