नवी दिल्ली, 08 जुलै: नवी दिल्लीत (New Delhi) एक व्यावसायिकावर (Businessman) गोळीबार करण्यात आला आहे. भररस्त्यात गोळ्या (Firing) घालून व्यावसायिकाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 32 वर्षीय अपूर्व जैन असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे. नारायणा भागात अपूर्व यांचा प्लास्टिकचा व्यवसाय आहे. सध्या अपूर्व यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी ही घटना घडली आहे.
नवी दिल्लीत एक व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. pic.twitter.com/1bAyjFQFg4
— News18Lokmat (@News18lokmat) July 8, 2021
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी अपूर्व यांच्यावर गोळीबार करताना कैद झालं आहे. आरोपींनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, मागून येऊन एका व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला. हेही वाचा- राजीव गांधींच्या पुतळ्यावर पेट्रोल फेकून लावली आग, व्हायरल VIDEO नंतर कारवाई सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.