पुलाची रेलिंग तोडून नदीत कोसळली जीप; 8 जणांचे मृतदेह हाती, तर 10 जण अजूनही बेपत्ता

पुलाची रेलिंग तोडून नदीत कोसळली जीप; 8 जणांचे मृतदेह हाती, तर 10 जण अजूनही बेपत्ता

प्रवाशांनी गच्च भरलेली एक जीप पुलाची रेलिंग तोडून गंगा नदीमध्ये कोसळली (Jeep Fell in Ganga River) आहे. या घटनेत आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह (8 People Died in an Accident) हाती आले आहेत.

  • Share this:

पाटणा 23 एप्रिल : देश एकीकडे कोरोना महामारीचा सामना करत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक कोरोना रुग्णांचे जीव जात असल्याचं वृत्त दररोज समोर येत आहे. अशात आता आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी गच्च भरलेली एक जीप पुलाची रेलिंग तोडून गंगा नदीमध्ये कोसळली (Jeep Fell in Ganga River) आहे. या घटनेत आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह (8 People Died in an Accident) हाती आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना बिहारची राजधानी पाटणाजवळच्या दानापूर येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्याठिकाणी ही घटना घडली तिथे चढ आहे. त्याच जागी पुल जीर्णदेखील झाला आहे. याच कारणामुळे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अजूनही 10 ते 12 जण बेपत्ता आहेत. स्थानिक लोक या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत. प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं आहे. ही घटना पीपा पुलाची निर्मिती करणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचं बोललं जात आहे. या पुलाचं काम चुकीच्या पद्धतीनं झालं आहे.

वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 जणांवर अंत्यसंस्कार

या पुलाचं काम चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं बऱ्याचदा इथे अनेक गाड्या घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. याठिकाणी अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. आजदेखील रेलिंग तोडून प्रवाशांनी भरलेली जीप गंगा नदीमध्ये कोसळली. अजूनही जवळपास बारा जणांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रशासन वेळेवर घटनास्थळी दाखल झालं आहे. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 23, 2021, 1:17 PM IST

ताज्या बातम्या