जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी दुर्घटना! 10 जणांना घेऊन जाणारी बोट पलटली; 8 जण बेपत्ता तर दोघांचा जीव वाचला

मोठी दुर्घटना! 10 जणांना घेऊन जाणारी बोट पलटली; 8 जण बेपत्ता तर दोघांचा जीव वाचला

मोठी दुर्घटना! 10 जणांना घेऊन जाणारी बोट पलटली; 8 जण बेपत्ता तर दोघांचा जीव वाचला

बोटीच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली. या बोटीवर एकूण 10 जण होते, त्यापैकी दोन जणांनी पोहून आपला जीव वाचवण्यात यश मिळवलं.

  • -MIN READ Jharkhand
  • Last Updated :

रांची 17 जुलै : झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. यात मरकच्चो ब्लॉकमध्ये असलेल्या धरणात बोट उलटल्याने 8 जण बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर बोटीतील 8 जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे (Jharkhand Boat Accident). स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ते 10 जण बोटीतून मरकच्चो ब्लॉक स्थिडॅम जलाशयात फिरण्यासाठी निघाले होते. यादरम्यान बोट उलटल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हे ठिकाण कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पत्नीच्या डोळ्यासमोर पतीने सोडला जीव, जेवणानंतर वॉकला गेलेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेल्यांमध्ये पाच मुलं, दोन महिला आणि दोन पुरुष अशा एकूण 9 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण गिरिडीह जिल्ह्यातील राजधनवार ब्लॉकमधील खेन्तो गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. बोटीवर बसलेले सर्व जण एकाच गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वजण गोरहंद धरणाला (पंचखेरो जलाशय) भेट देण्यासाठी आले होते. बोटीच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली. या बोटीवर एकूण 10 जण होते, त्यापैकी दोन जणांनी पोहून आपला जीव वाचवण्यात यश मिळवलं. घटनास्थळी मरकच्चो ब्लॉकचे सीओ राम सुमन प्रसाद, पोलीस ठाण्याचे प्रभारी सुमित साओ आणि नवलशाही पोलीस ठाण्याचे प्रभारी पंचम तिग्गा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात उपस्थित आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक लोक आणि पोलीस हजर आहेत. Sangli Police : तो पुष्पा कोण? चोरट्यांचे पोलिसांना थेट आव्हान पोलीस मुख्यालयातीलच चंदनाची झाडे चोरली बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मरकच्चोचे सीईओ राम सुमन प्रसाद पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री कम कोडरमा खासदार अन्नपूर्णा देवी यांनी कोडरमा आणि गिरिडीहच्या उपायुक्तांशी बोलून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि मदतकार्य करण्यास सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident , boat
  • First Published :
जाहिरात
जाहिरात