जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पत्नीच्या डोळ्यासमोर पतीने सोडला जीव, जेवणानंतर वॉकला गेलेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

पत्नीच्या डोळ्यासमोर पतीने सोडला जीव, जेवणानंतर वॉकला गेलेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

पत्नीच्या डोळ्यासमोर पतीने सोडला जीव, जेवणानंतर वॉकला गेलेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

भोजराज हे त्यांची पत्नी उषा गाखरे यांच्यासोबत घराशेजारीच असलेल्या रस्त्यावर जेवणानंतर वॉकसाठी गेले होते. मात्र रस्त्यावर चालत असताना दाम्पत्याला भरधाव वाहनानं धडक दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नरेंद्र मते, वर्धा, 17 जुलै : वर्धात वाहनाच्या धडकेत एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. तर पत्नी थोडक्यात बचावली आहे. वर्ध्याच्या कारंजा येथे शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भोजराज गाखरे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. भोजराज हे त्यांची पत्नी उषा गाखरे यांच्यासोबत घराशेजारीच असलेल्या रस्त्यावर जेवणानंतर वॉकसाठी गेले होते. मात्र रस्त्यावर चालत असताना दाम्पत्याला भरधाव वाहनानं धडक दिली. या धडकेत भोजराज यांचा जागीच त्यांच्या पत्नीच्या समोरच मृत्यू झाला आहे. तर बचावलेल्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र पतीच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘जाऊ दे, मीच फेटा बांधतो’, मंत्रिपदावरून पायउतार झालेल्या धनंजय मुंडेंचा आत्मनिर्भर VIDEO व्हायरल मिळालेल्या माहितीनुसार, धडक दिलेली गाडी वनविभागाची आहे. मात्र या गाडीवरील चालक खासगी आहे.  राजू उईके असं या वाहनचालकाचं नाव आहे. चाल राजू मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला आदळली. अपघातानंतर चालक आपल्या ताब्यातील वाहन सोडून घटनास्थळावरून पळून जात पोलीस ठाण्यात हजर झाला. या अपघाताप्रकरणी आरोपी वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. Sangli Police : तो पुष्पा कोण? चोरट्यांचे पोलिसांना थेट आव्हान पोलीस मुख्यालयातीलच चंदनाची झाडे चोरली जळगावात नदीत पोहायला गेलेल्या एकाचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील भोकनी शिवारात ही घटना घडली आहे. गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी एका 13 वर्षाचा मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विशाल जोहरे असं मृत मुलाचे नाव आहे. शिवाजीनगरात राहणारे यश भालेराव, प्रेम झांझळ, मुयर सपकाळे व विशाल जोहरे असे चौघे भोकणी गावाजवळ गिरणा नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना हे सर्वजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडत होते. हा प्रकार नदीकाठी असलेल्या काही ग्रामस्तांच्या लक्षात आला. त्यांनी यश, परशुराम आणि प्रेम यांना पाण्यातून बाहेर काढले. पण विशाल मात्र बाहेर निघू शकला नाही. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तो गाळात, डोहात अडकला आणि त्यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात