शक्ती सिंह, प्रतिनिधी कोटा, 22 जून : कोटा औद्योगिक परिसरातील युरिया कारखान्यात रात्री उशिरा 6 फूट लांबीचा कोब्रा मशीनमध्ये वळवळताना दिसल्याने एकच खळबळ उडाली. फणा पसरलेला नाग पाहून मजुरांना धडकीच भरली. 30 ते 40 मजुरांनी एकापाठोपाठ एक घाबरून कारखान्याबाहेर धूम ठोकली आणि सगळं कामच बंद पडलं. कारखान्यात कोब्रा असल्याची बातमी मिळताच मालकाने सर्पमित्र गोविंद शर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना तातडीने घटनास्थळी बोलवून घेतलं. ते येईपर्यंत सर्व मजूर कारखान्याबाहेरच थांबले होते.
गोविंद शर्मा यांनी अर्धा तासांच्या प्रयत्नांनी नागाला पकडलं आणि वनविभागाला माहिती देऊन त्याला लाडपुरा जंगलात सुखरूपपणे सोडून दिलं. साप जंगलात गेल्याचं ऐकल्यानंतर मजुरांच्या जीवात जीव आला. NCP : वडिलांची इस्टेट अन् मुलीचा वाटा, शरद पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदी प्रोजेक्ट? दरम्यान, गोविंद यांनी सांगितलं की, ‘आपण त्रास दिल्याशिवाय साप आपल्याला त्रास देत नाही. त्यामुळे साप दिसल्यावर घाबरून जाऊ नका किंवा त्याला मारायचा प्रयत्न करू नका, त्यातून तुम्हालाच इजा होऊ शकते. तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही मदतीसाठी तातडीने घटनास्थळी पोहोचू. तुमची आणि सापाची सुखरूप सुटका करू’, असं ते म्हणाले.