जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / NCP : वडिलांची इस्टेट अन् मुलीचा वाटा, शरद पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदी प्रोजेक्ट?

NCP : वडिलांची इस्टेट अन् मुलीचा वाटा, शरद पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदी प्रोजेक्ट?

शरद पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदी प्रोजेक्ट

शरद पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदी प्रोजेक्ट

शरद पवारांच्या एका मास्टरस्ट्रोक राष्ट्रवादी पक्षावर दावे करणारे सर्व नेत्यांना गार केलंय. एवढंच नाही, तर सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी विराजमान करत, सुप्रिया याच त्यांच्या वारसदार असल्याचंही अप्रत्यक्षणे स्पष्ट केलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 जून : शरद पवारांच्या एका मास्टरस्ट्रोक राष्ट्रवादी पक्षावर दावे करणारे सर्व नेत्यांना गार केलंय. एवढंच नाही, तर सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी विराजमान करत, सुप्रिया याच त्यांच्या वारसदार असल्याचंही अप्रत्यक्षणे स्पष्ट केलंय. पण, आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रमोट करायला सुरुवात केल्याची पाहायला मिळतंय. पुण्याच्या यशस्विनी पुरस्कार सोहळ्यात यशस्वी महिलांचा उल्लेख करताना, पवारांनी सुप्रिया सुळेंचे संदर्भ जोडले ते पाहता, सध्या पवारांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाला जनमानसात पोहोचवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. पवारांनी यापुढे जाऊन बापाच्या संपत्तीत मुलीचा समान वाटा असल्याचं सांगत, सुप्रिया सुळे याच आपल्या वारसदार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. बापाच्या इस्टेटीत मुलीला समसमान संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय घेताना आमच्याच काही राज्यकर्त्यांनीच विरोध केला होता, पण त्यावेळी त्या नेत्यांना समजावून सागितलं आणि हा कायदा पास झाला, असं शरद पवार म्हणाले. अजित पवारांना का हवंय राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद? NCPतल्या राजकारणाची Inside Story खरंतर शरद पवारांनी आधीच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्ष बनवत, राष्ट्रवादीची धूरा त्यांच्या हाती सोपवली, त्यामुळे आगामी निवडणुकीतील तिकीट वाटपात सुप्रिया सुळेंच करणार हे स्पष्ट झालं. पण, ज्यापद्धतीनं आता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनीही राज्यभर दौरे सुरु केले आहेत, ते पाहता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेंचं अप्रत्यक्ष प्रमोशन सुरु झाल्याची चर्चा आहे. खरंतर 2 मे रोजी शरद पवारांच्या राजीनाट्यानंतर अजित पवार पक्षात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंनाही बोलण्यापासून रोखल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं. पण, अवघ्या दीड महिन्यात राष्ट्रवादीतील चित्र उलटलंय. अजित पवारांनी पक्ष संघटनेत पद मागत प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी भुजबळ आशावादी, स्वत:सोबत घेतली आणखी तिघांची नावं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात